खेड (पुणे) -तालुक्यातील खरपुडी येथे धावत्या चारचाकीचा पुढील टायर फुटल्याने चारचाकी भीमा नदीच्या पुलावरुन खाली पडली आहे. ही घटना आज (दि. 24 मे)घडली आहे. या ठिकाणाहून जाणाऱ्या एका ग्रामस्थाने गाडी पाण्यात पडताच गाडीची काच फोडून वाहनात असलेल्या चालकाला बाहेर काढल्यामुळे वाहन चालकाचा जीव वाचला आहे. संतोष गाजरे (रा. तळेगाव, ता. मावळ), असे चारचाकी चालकाचे नाव आहे.
टायर फुटल्याने चारचाकी कार कोसळली नदीत; स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेने चालकाचे वाचले प्राण - खेड शहर बातमी
धावत्या चारचाकी वाहनेचे टायर फुटल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. यामुळे वाहन पुलावरून भीमा नदीत कोसळले. ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत काच फोटून चालकाला वाचविले.
![टायर फुटल्याने चारचाकी कार कोसळली नदीत; स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेने चालकाचे वाचले प्राण अपघातग्रस्त वाहन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11891562-1070-11891562-1621935184516.jpg)
अपघातग्रस्त वाहन
संतोष गाजरे हे सेझ प्रकल्प येथे कामासाठी त्यांची चारचाकी घेऊन जात होते. दरम्यान, भीमा नदी पुलावर आल्यानंतर गाडीचा पुढचा एक टायर अचनाक फुटला त्यामुळे चालक गाजरे यांचा वाहनावरील ताबा सुटला. पुलाचे 3 सिमेंट कठडे तोडून गाडी नदीत कोसळली. ही घटना पाहताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी पळ काढत वाहन चालकास गाडीची काच फोडून सुखरूप बाहेर काढले.
हेही वाचा -पाण्याच्या बहाण्याने महिलेला खोलीत बोलवले; अन् केला लैंगिक अत्याचार