महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे-सोलापूर महामार्गावर धावत्या चारचाकीने घेतला पेट - pune accidenr news

सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रावणगाव खडकीच्या हद्दीत धावत्या चारचाकीला अचानक आग लागली. यामध्ये जीवित हानी टळली असली, तरीही आगीमुळे कार जळून खाक झाली आहे. सोलापूर मार्गावर रविवारी (दि. 29 नोव्हेंबरला) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास संबंधित घटना घडली.

car burnt on solapur highway
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर धावत्या चारचाकीने घेतला पेट

By

Published : Nov 30, 2020, 2:32 PM IST

पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रावणगाव खडकीच्या हद्दीत धावत्या चारचाकीने अचानक पेट घेतला. यामध्ये जीवितहानी टळली असली, तरीही आगीमुळे कार जळून खाक झाली आहे. सोलापूर मार्गावर रविवारी (दि. 29 नोव्हेंबरला) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास संबंधित घटना घडली.

महामार्गावर धावत्या कार ने घेतला अचानक पेट

पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या चारचाकीने अचानक पेट घेतला. हे लक्षात येताच दोन प्रवाशांनी बाहेर उड्या मारल्या. यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र कारने चारही बाजूने पेट घेतल्याने महामार्गावर आगीचा डोंब हवेत पसरत होता. या आगीमुळे महामार्गावरील वाहतूक काही काही वेळ थांबवण्यात आली होती.

अग्निशामक दलाचे आग विझविण्यासाठी प्रयत्न

घटनेची माहिती मिळताच रावणगाव पोलीस चौकीचे बाबुराव बंडगर आणि अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. आग विझविण्यासाठी दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दलाशी संपर्क साधण्यात आला. मात्र तोपर्यंत कार पूर्णत: जळून खाक झाली.

ABOUT THE AUTHOR

...view details