पुणे : पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेचे (डीआरडीओ) चे संचालक प्रदीप कुरुलकर यांना हनीट्रॅपमध्ये अडकवून पाकिस्तानला माहिती दिल्याचा आरोप आहे. त्यांना एटीएसकडून अटक करण्यात आली आहे. आज कुरुलकर यांना न्यायालयात हजर करण्यात आले होत. यावेळी त्यांना 14 दिवसांची म्हणजेच 29 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. कुरुलकर यांची आत्ता येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
ऑफिशली सिक्रेट ॲक्ट खाली गुन्हा :याबाबत सरकारी वकील चंद्रकिरण साळवी यांनी याबाबत माहिती दिली की, न्यायालयाने आज न्यायालयीन कोठडी दिली आहे. तसेच तपास अधिकाऱ्यांनी देखील न्यायालयीन कोठडी मागितली होती. यांच्यात ऑफिशली सिक्रेट ॲक्ट खाली गुन्हा रजिस्टर आहे. तसेच पुढील तपास देखील सुरू आहे. देशद्रोहाचा गुन्ह्याबाबत साळवी म्हणाले की, याबाबत तपास सुरू असून कुरुलकर यांच्या मोबाईलमध्ये इमेज आढळुन आल्या आहेत. त्या इमेज फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आल्या आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर तपासाची पुढील दिशा ठरणार आहे. या प्रकरणी ऑफिशली सिक्रेट ॲक्ट खाली गुन्हा दाखल झाला असून तपास जसाजसा पुढे जाईल तसेतसे कलम वाढू शकतात.
मोबाईलमध्ये इमेज सापडल्या :काल एका दिवसाची कोठडी देण्यात आली होती. ती यासाठी देण्यात आली होती की, कुरुलकर यांच्याकडे जो मोबाईल होता तो फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आल होता. तो डीकोडींग झाला नाही. तो कुरुलकर यांच्या मदतीने उघडण्यात आला. त्यात इमेज सापडल्या आहेत. त्या सर्व इमेज फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहे, म्हणून काल एक दिवसीय कोठडी देण्यात आली होती.