पुणे- गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या शिवशाही आणि खासगी ५ ते ६ बसेसला आग लागली. ही घटना आज बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास पुणे-सातारा रस्त्यावर शिंदेवाडी येथे घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि दोन टँकर घटनास्थळी दाखल झाले.
गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या ५ ते ६ शिवशाही व खासगी बसेसला आग - fire
गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या शिवशाही आणि खासगी ५ ते ६ बसेसला आग लागली. तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर सकाळी सव्वा अकरा वाजता आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

बसेसला लागलेली आग
आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशमन दल
तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर सकाळी सव्वा अकरा वाजता आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र, अद्याप आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या अन्य १० ते १२ बसेसला आगीची झळ पोचली आहे.