पुणे -येथील नीलज्योती (मार्ग क्रमांक 59) दरम्यान पीएमपी बसमध्ये घुसून गुंडगिरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र, चालक-वाहक यांनी आरडाओरड करताच हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. दरम्यान, ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
दिवसाढवळ्या हल्ले करून लुटमार करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. असाच एक प्रकार नीलज्योती थांब्यावरुन जाणाऱ्या पीएमपी बसमध्ये घडला. शुक्रवारी (ता. 14) सायंकाळी सहाच्या सुमारास दोन युवकांनी बसमध्ये प्रवेश करत वाहक कैलास रणदिवे यांना मारहाण करत लुटण्याचा प्रयत्न केला. वाहक रणदिवे आणि चालक महादेव शिंदे यांनी आरडाओरडा केल्यामुळे दोन्ही हल्लेखोर युवक पळून गेले. हा प्रकार बसमधील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.