महाराष्ट्र

maharashtra

Pune Solapur Road Accident: पुणे-सोलापूर महामार्गावर बसचा भीषण अपघात, ४ जण जागीच ठार, १५ जखमी

By

Published : Feb 1, 2023, 12:20 PM IST

पुणे-सोलापूर महामार्गावर पुणे जिल्ह्यातील यवत गावाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला बसने धडक दिल्याने 4 जण ठार, 15 जखमी झाले आहे. सकाळी 5 च्या सुमारास ही वाजता ही घटना घडली.

Pune Solapur Road Accident
पुणे-सोलापूर महामार्गावर बसचा भीषण अपघात

पुणे:हा अपघात सोलापूर -पुणे महामार्गावर यवत जवळील माणगाव सीएनजी पंपासमोर पहाटे सव्वा पाच वाजता घडला़. मृतांमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. पोलीस कर्मचारी नितीन दिलीप शिंदे (वय ३६) अमर मानतेश कलशेट्टी (वय २०), गणपत मलप्पा पाटील (वय ५५), आरती बिराजदार (वय २५) अशी मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत. अपघातात १५ जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

टायर फुटल्याने अपघात:सोलापूरहून एक खासगी ट्रॅव्हल बस पुण्याकडे येत होती. सर्व प्रवासी झोपेत असताना पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास माणगावजवळील सीएनजी पंपाजवळ टायर फुटल्याने हा अपघात घडला. एक ट्रक रस्त्यात थांबलेला होता बसचालकाला हा ट्रक उशीरा दिसला़ त्याला चुकवून पुढे जाताना चालकाचा अंदाज चुकला. बसने ट्रकला मागून जोरात धडक दिली. त्यात बसची एक बाजू पूर्णपणे फाटली आहे. या अपघातात चालकही जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस व यवत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

समोरासमोर धडक:या आधीही 13 जानेवारीला अपघात घडला होता. मुंबई येथून शिर्डीकडे येणाऱ्या खाजगी आराम बस क्रमांक एम एच 04 एसके 2751 व शिर्डीबाजू कडून सिन्नर बाजूकडे जाणारा मालट्रक क्रमांक एम एच 48 टी 1295 यांची समोरासमोर धडक होऊन आपघात झाला होता. पाथरे ते पिंपळवाडी येथील टोलनाक्यादरम्यान एकेरी वाहतूक सुरू होती. अंबरनाथ ठाणे परिसरातील सुमारे 50 प्रवासी या बसमधून शिर्डीकडे प्रवास करत होते.

कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये दिले:शिक शिर्डी महामार्गावर वावी पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बसच्या अपघातासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले होते. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले होते.या अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून याविषयी अधिक माहिती घेतली होती. या अपघातात दहा जण ठार झाले होते. अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तातडीने शिर्डी नाशिक या ठिकाणी हलवून त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात आले होते.

हेही वाचा:Truck Bus Accident शिर्डीजवळ ट्रक व बसचा भीषण अपघात दहा साईभक्तांचा मृत्यू मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर

ABOUT THE AUTHOR

...view details