पुणे - आझाद हिंद एक्सप्रेसच्या स्वच्छतागृहात ७ जीवंत काडतुसे आढळल्याने एकच खळबळ उडाली. सकाळी पुणे रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. घोरपडी येथील यार्डात गाडी स्वच्छ करताना शौचालयाच्या कचरापेटीत कर्मचाऱ्याला ही काडतुसे सापडली.
पुणे रेल्वे स्थानकात आढळली एके ४७ ची जिवंत काडतुसे हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड: आरोपीचे वकीलपत्र न स्वीकारण्याचा वकील संघाचा निर्णय
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ही काडतुसे ताब्यात घेतली. त्यानंतर सैन्यदलाशी संबंधित अधिकाऱ्याला बोलवून खातरजमा केली असता ही काडतुसे एके ४७ बंदुकीची असल्याचे निष्पन्न झाले. रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा - 'जर भाजपने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला नाही, तर लोकांची मते खड्ड्यात'