पुणे- बैल हा शेतकऱ्याचा सखा सोबती मानला जातो, बैलाचे पालनपोषण शेतकरी स्वत:च्या लेकरा प्रमाणे करतो. मात्र, भूतदयेला काळीमा फासणारी एक घटना आंबेगाव तालुक्यातील कुरवंडी गावात घडली आहे. गोठ्यात बांधलेल्या अडीच वर्षाच्या बैलाला अज्ञाताने गळफास देऊन ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बैलाच्या हत्येनंतर परिसरात संतापाची लाट...
आंबेगाव तालुक्यातील शेतकरी संदीप तोत्रे यांनी पंढरपूर येथून खिलार जातीचे दीड वर्ष वयाचे वासरु विकत आणले होते. त्याला चांगला खुराक दिल्याने बैल चांगला तरबेज आणि रुबाबदार दिसत होता. या बैलाला अनेकांनी चांगली किंमत देऊन खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र संदिप तोत्रे यांनी बैलाची विक्री केली नाही. मात्र बुधवारी रात्रीच्या सुमारास बैलाच्या गोठ्यातील खांबाला रस्सीच्या सहाय्याने क्रुरपणे गळफास देऊन ठार मारल्याची घटना घडली आहे. मात्र तोत्रे यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नाही. त्यामुळे बैलाच्या हत्येनंतर परिसरात संतापाची लाट पसरली आहे.
क्रुरतेचा कळस..! गोठ्यातच बैलाला गळफास देऊन अज्ञाताने केले ठार - गोठ्यात बैलाची हत्या
अज्ञात व्यक्तीने बैलाला गळफास लावून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
बैलाला गळफास देऊन अज्ञाताने केले ठार
कुरवंडी येथे शेतकऱ्याच्या गोठ्यात शिरुन बैलाची क्रूरतेने हत्या केल्याप्रकरणी संदीप तोत्रे यांनी मंचर पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीनुसार अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला. मात्र, अशा क्रूरप्रवृत्तीच्या नराधम आरोपींना पोलिसांनी तातडीने अटक करून कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.