पुणे :काही दिवसांपूर्वी खडक पोलीस स्टेशनच्या हाद्दीत आपल्या शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना ताजी असताना काका पुतीनीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. आई-वडील आपल्या दोन मुलींना चुलत्याच्या घरी सोडून दिल्लीला गेल्यानंतर दोन्ही मुलींवर चुलत्याने व त्याच्या मित्राने पुतनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मित्रालाही अत्याचार करण्यास सांगितले : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी समाजसेविका ही पीडित मुलींच्या ओळखीची असून, 14 आणि 10 वर्षांच्या दोन मुलींना तिच्या आई-वडिलांनी आपल्या 29 वर्षांच्या चुलत्याजवळ सोडून दिल्ली येथे कामानिमित्त गेले होते. याचाच गैरफायदा घेत आरोपी चुलत्याने स्वतः लैंगिक अत्याचार केला. आणि त्याच्या मित्रालाही अत्याचार करण्यास सांगितले. हा प्रकार 20 दिवसांपूर्वी घडला.