महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

फोनवर बोलत नसल्याने मावस भावाचा बहिणीला जीवे मारण्याचा प्रयत्न; स्वत: केली आत्महत्या

बहिण पूर्वीप्रमाणे फोनवर बोलत नसल्याच्या कारणावरून मावस भावाने बहिणीला जीवे मारण्याचा प्रयत्न करत स्वत: विषारी औषध पिऊन आत्महत्या केली.

mangesh borhade
मंगेश बोऱ्हाडे

By

Published : Feb 20, 2020, 5:10 PM IST

पुणे - बहिण पूर्वीप्रमाणे फोनवर बोलत नसल्याच्या कारणावरून मावस भावाने बहिणीला जीवे मारण्याचा प्रयत्न करत स्वत: विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आंबेगाव तालुक्यातील एका गावात घडला आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला असून जखमी बहिणीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगेश बोऱ्हाडे असे आत्महत्या केलेल्या भावाचे नाव आहे.

फोनवर बोलत नसल्याने मावस भावाचा बहिणीला जीवे मारण्याचा प्रयत्न; स्वत: केली आत्महत्या

पूर्वीप्रमाणे ती फोनवर बोलत नाही. तसेच फोनसुद्धा उचलत नाही. याचा राग मनात धरून मंगेशने मावस बहिणीच्या घरी जात तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. तसेच त्या मुलीच्या आईलाही त्याने धक्काबुक्की केली आहे. यावेळी आरडाओरड झाल्याने मंगेशने घटनास्थळावरून पळ काढला व नंतर स्वत: विषारी औषध घेत आत्महत्या केली आहे. मावस बहिणीवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून मंचर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details