पुणे - तळेगावहून एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील आंबी येथील ब्रिटिशकालीन पूल सोमवारी पहाटेच्या सुमारास अचानक कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, पुलावरून अवजड वाहतुकीला बंदी असताना देखील वाहनचालक पुलावरून वाहतूक करत होते.
सविस्तर माहिती अशी की, तळेगाव एमआयडीसीकडे जाणाऱ्या ब्रिटिशकालीन पुलाचा मधला भाग अचानक सोमवारी पहाटे कोसळला. या घटनेत कोणतीही जीविहितहानी झालेली नाही. या पुलावरील अवजड वाहतूक गेली ५ वर्षे बंद करण्यात आली होती. दरम्यान, पुलाला धोकादायक पूल म्हणून संबंधित प्रशासनाने जाहीर केले होते. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या वाहनांना वाहतुकीस मज्जाव करण्यात आला होता. हा ब्रिटिश कालीन पूल इंद्रायणी नदीवर बांधण्यात आला होता.