पुणे - शहरात पेठा आणि डेक्कन परिसराला जोडणाऱ्या झेड ब्रिजच्या संरक्षक कठड्याचा काही भाग शनिवारी कोसळला. या घटनेत सुदैवाने कुणालाही हानी झाली नाही. पावसाने हा कठडा कोसळला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुण्यातील झेड ब्रिजचा संरक्षण कठडा कोसळला;
शहरात पेठा आणि डेक्कन परिसराला जोडणाऱ्या झेड ब्रिजच्या संरक्षक कठडेचा काही भाग शनिवारी कोसळला. या घटनेत कुणालाही हानी झाली नाही.
झेड ब्रिजचा संरक्षण कठडा कोसळला
सततचा वाहतुकीचा मार्ग असलेल्या या ब्रीजचा संरक्षक कठडा कोसळल्याने वाहन धारकांनी काळजीने वाहन चालवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा कठडा कशामुळे पडला याबाबत साशंकता आहे. शहरात शुक्रवारपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे पावसाने हा कठडा कोसळला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. झेड ब्रीजच्या शेजारी मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. सुदैवाने घटनेत कुठलीही हानी झालेली नाही.