पुणे - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या विरोधात ब्राह्मण महासंघ आक्रमक झाला आहे. सांगली येथील सभेत राजू शेट्टी यांनी ब्राम्हण समाजाविरोधात वक्तव्य केले. या वक्तव्याचा निषेध करत लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी संघटनेवर ब्राह्मण समाजाने बहिष्कार टाकावा, असे आवाहन ब्राह्मण महासंघाकडून करण्यात आले आहे.
समाजा विरोधात वक्तव्य केल्याने स्वाभिमानी संघटनेवर बहिष्कार घाला - ब्राह्मण महासंघ - Swabhimani Sanghatana
सैन्यात आपली पोरं जातात, देशपांडे कुलकर्णी जात नाहीत, असे जातीयवादी वक्तव्य केल्याचा आरोप ब्राम्हण महासंघाने केला आहे. यामुळे येत्या निवडणूकीत राजू शेट्टी यांचा पराभव करण्याचे आवाहन ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे यांनी केले आहे.
सैन्यात आपली पोरं जातात, देशपांडे कुलकर्णी जात नाहीत, असे जातीयवादी वक्तव्य केल्याचा आरोप ब्राम्हण महासंघाने केला आहे. यामुळे येत्या निवडणूकीत राजू शेट्टी यांचा पराभव करण्याचे आवाहन ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे यांनी केले आहे. हातकणंगले मतदारसंघात ब्राम्हण समाजाची २२ हजारापेक्षा जास्त मत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात तळ ठोकून शेट्टी विरोधात प्रचार करणार असल्याचा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला. या प्रकरणी खासदार राजू शेट्टी विरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली असल्याचेही ते म्हणाले.