महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा चंद्रकांत पाटलांना पाठींबा ; गोविंद कुलकर्णी यांची माहिती - Chandrakant Patil

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना आरपीआय महायुतीचे उमेदवार चंद्रकांत  पाटील यांना पाठींबा जाहीर केला आहे.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा चंद्रकांत पाटलांना पाठिंबा ; गोविंद कुलकर्णी यांची माहिती

By

Published : Oct 7, 2019, 7:42 PM IST

पुणे -अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने अखेर कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना आरपीआय महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना पाठींबा जाहीर केला आहे. ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी माहिती दिली.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा चंद्रकांत पाटलांना पाठिंबा ; गोविंद कुलकर्णी यांची माहिती


ब्राह्मण समाजाच्या मागण्यांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात येईल. ब्राह्मण समाजासाठीचे आर्थिक विकास महामंडळ, विद्यार्थ्यांचे प्रश्न या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन चंद्रकांत दादा पाटील यांनी दिल्याचं गोविंद कुलकर्णी यांनी सांगितले.


अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रवक्ते आनंद दवे यांनी दोन दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांना ब्राह्मण महासंघाचा पाठींबा असल्याचे पत्रक काढले होते. आनंद दवे यांनी महासंघाच्या इतर पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता पत्रक प्रसिद्ध केले होते त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले असून ते निलंबन कायम असल्याचे गोविंद कुलकर्णी यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details