महाराष्ट्र

maharashtra

भारतरत्न सोडा निदान नोटांवर तरी सावरकरांचा फोटो छापा, ब्राह्मण महासंघाची मागणी

देशात भाजपची सत्ता आली तर शंभर दिवसांत स्वातंत्र्यवीर सावरकर यांसाठी भारतरत्न पुरस्कार जाहीर करु, असे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारला विसर पडला आहे. देशात भाजपच्या सत्तेला सात वर्षे झाले असून आतापर्यंत भारतरत्नची घोषणा करण्यात आली नाही. पण, शुक्रवारी सावरकरांची 138 वी जयंती असून या पार्श्वभूमवर केंद्र सरकारने नोटांवर किंवा नाण्यांवर सावरकरांच छायाचित्र छापावे, अशी मागणी ब्राह्मण महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.

By

Published : May 26, 2021, 5:40 PM IST

Published : May 26, 2021, 5:40 PM IST

दवे
दवे

पुणे- काही प्रमाणात वैचारिक विरोध असतानाही 1970 ला काँग्रेसचे सरकार असताना वीर सावरकर यांच्या नावाने पोस्टाचे तिकीट काढले गेले होते. पण, आता त्यांच्या नावाने मते मागून त्यांना भारतरत्न देण्याचे खोटे आश्वासन नरेंद्र मोदी सत्ते आले. मात्र, मोदी सरकारने गेल्या 7 वर्षात ना सावरकर यांच्या नावाने काही योजना राबवली ना कोणताही पुरस्कार घोषित केला ना त्यांच्या नावाने कोणते स्टेडियम बांधले. त्यामुळे शुक्रवारी (दि.28 मे) सावरकर यांच्या 138 व्या जयंतीच्या दिवसाचे औचित्य साधून निदान भारतीय नोटांवर त्यांचे छायाचित्र तरी छापावेत, अशा मागणीचे निवेदन ब्राह्मण महासंघाच्या वतीने पंतप्रधान कार्यालय आणि अर्थमंत्र्यांना मेलद्वारे पाठवण्यात आले आहे.

बोलताना दवे

भारतीय नोटांवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे फोटो तरी छापावेत

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न मिळावे ही ब्राह्मण जुनी मागणी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना पुण्यात त्यांनी एका कार्यक्रमात सांगितले होत की देशात सरकार आल्यांनतर शंभर दिवसात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न मिळाले पाहिजे, अशी घोषणा केली होती. पण, आज याच मोदी सरकारला 7 वर्षे झाले असतानाही सावरकर यांच्या विषयी काहीही वाटलेले नाही. मोदी सरकारला पुढील निवडणुकीच्या फायद्यासाठी पुढील एक ते दोन वर्ष थांबायचे असेल तर थांबावे. पण, 28 मे रोजी सावरकर यांच्या 138 व्या जयंतीच्या दिवसाचे औचित्य साधून भारतीय नोटांवर किंवा नाण्यांवर त्यांचे फोटो तरी छापावेत, अशी मागणी यावेळी ब्राह्मण महासंघाच्यावतीने करण्यात आली आहे.

हेही वाचा -लहान मुलांचा कोरोना होऊ नये म्हणून घ्यावी 'ही' काळजी

ABOUT THE AUTHOR

...view details