पुणे- मोबाईलवरून झालेल्या किरकोळ वादातून बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करणाऱ्या प्रेयसीच्या चेहऱ्यावर प्रियकरानेच अॅसिड फेकल्याची घटना समोर आली आहे. ही धक्कादायक घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. विष्णू गोपाळ प्रमाणे (वय 20) असे आरोपीचे नाव आहे.
मोबाईलवरून झालेल्या किरकोळ वादातून प्रियकराने प्रेयसीवर फेकले अॅसिड - pi k.n nawande
मोबाईलवरून झालेल्या किरकोळ वादातून बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करणाऱ्या प्रेयसीच्या चेहऱ्यावर प्रियकरानेच अॅसिड फेकल्याची घटना समोर आली आहे. विष्णू गोपाळ प्रमाणे (वय 20) असे आरोपीचे नाव आहे.
फरासखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. एन. नावंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळची पश्चिम बंगालमधील असलेली ही तरुणी बुधवार पेठेतील एका इमारतीत वेश्या व्यवसाय करते. गावातीलच एका तरुणाशी तिचे प्रेमसंबंध आहेत. हा तरुण तिला नेहमी भेटण्यासाठी येत होता. आज दुपारच्या सुमारासही तो तिला भेटण्यासाठी आला होता. भेटी दरम्यान त्यांच्यात मोबाईलवरून वाद झाला. त्यावरुन आरोपीने स्वच्छतागृहात वापरले जाणारे अॅसिड तरुणीच्या तोंडावर फेकले.
या घटनेनंतर तरुणीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तरुणीच्या तोंडावर थोडीफार जखम झाली असून तिची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. फरासखाना पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.