पुणे : प्रेयसीकडून प्रेम भंग झाल्याने प्रियकराने प्रियेसीच्या घरी चोरी केल्याचा प्रकार पुण्यात घडला ( Boyfriend Steals Valuable Worth From Gf House ) आहे. त्यासाठी प्रियकराने युट्युबवरून चोरी करण्याचे प्रशिक्षण घेतलेले ( Plagiarize Training From YouTube ) आहे. या संदर्भामध्ये भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनने प्रियकराला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जी प्रेमिका आहे ती विदेशामध्ये स्टेज शो करत असते. आपल्या कुत्र्याला बाहेर फिरवण्यासाठी ती गेली होती. तेव्हा तेव्हा प्रियकराने चोरी केली. प्रियकराचे नाव सुमित बाबू परदेशी असे असून पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे.
ब्रेकअप झाल्याने BF ने केली GF च्या घरी चोरी; YouTube वरून घेतले चोरीचे ट्रेनिंग
प्रेयसीकडून प्रेम भंग झाल्याने प्रियकराने प्रियेसीच्या घरी चोरी केल्याचा प्रकार पुण्यात घडला ( Boyfriend Steals Valuable Worth From Gf House ) आहे. त्यासाठी प्रियकराने युट्युबवरून चोरी करण्याचे प्रशिक्षण घेतलेले ( Plagiarize Training From YouTube ) आहे. या संदर्भामध्ये भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनने प्रियकराला अटक केली आहे.
प्रियकराची प्रियेसीच्या घरी चोरी :24 वर्षीय एका तरुणीने भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये ( Bharti University Police Station ) या संदर्भात तक्रार दिली रात्री आंबेगाव बुद्रुक या परिसरात मध्ये असलेल्या लक्ष्मी सोसायटीमध्ये प्रियकराने बंद खोलीमध्ये सामान चोरी झाल्याची तक्रार दिली आहे. या चोरीमध्ये 14 लाख 50 हजार रुपयांचा सामान चोराने चोरलेला आहे. भारतीय विद्यापीठ पोलीस चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट उपनिरीक्षक धीरज गुप्ता पोलिसा हवलदार रवींद्र चिप्पा सचिन सर पाले अवधूत जमदाडे अभिनव चौधरी आणि त्यांच्या टीमने यासंदर्भात तपास करत होते.
घटना कॅमेरेमध्ये कैद :हा प्रकार परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरेमध्ये कैद झाला असून, सीसीटीव्हीमध्ये चोराने चोरी केल्याचे दिसत आहे. सुमित परदेशीला पोलिसांनी अटक केली आहे. सुरुवातीला सुमित परदेशी उडवा उडवी चे उत्तरे देत होता होता. त्यानंतर मात्र त्यांनी गुन्हा कबूल केला आहे. त्याच्या जवळील चोरीचे सामान पोलिसांनी जप्त केलेला आहे .आरोपी हा माशाचा व्यवसाय करत होता. त्यांची प्रेमिका दुसऱ्या सोबत बोलत असताना तिचा राग येत होता. म्हणून त्यांनी चोरी केली आहे. यापूर्वी मी कधीही अपराध केला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. चोराने चोरी केलेले दागिने त्याच्या घराच्या लाईटच्या मीटरमध्ये लपवले होते. त्यामुळे कुणाला शंका येऊ नये. गुन्हा कबूल केल्यानंतर पोलीस कडे ते दागिने दिले आहेत.