महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुथडी भरून वाहणाऱ्या मुठा नदीत पोहण्यासाठी उडी मारलेला तरूण बेपत्ता - डेंगळे पुल

मुठा नदीत डेंगळे पुलावरून पोहण्यासाठी उडी घेणारा तरूण बेपत्ता झाला आहे. निखिल थोरात असे बुडालेल्या तरूणाचे नाव असून, त्याला शोधण्यात यश आलेले नाही.

मुठा नदीत डेंगळे पुलावरून पोहण्यासाठी उडी घेणारा तरूण बेपत्ता झाला आहे

By

Published : Aug 3, 2019, 7:40 PM IST

पुणे -शहरातून वाहणाऱ्या मुठा नदीत डेंगळे पुलावरून पोहण्यासाठी उडी घेणारा तरूण बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. खडकवासला धरणातून गेल्या काही दिवसांपासून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शनिवारी मुठा नदीमध्ये 27 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असताना, ही घटना घडली.

मुठा नदीत डेंगळे पुलावरून पोहण्यासाठी उडी घेणारा तरूण बेपत्ता झाला आहे
सध्या मुठा नदी दुथडी भरून वाहत आहे. महानगरपालिकेजवळ असणाऱ्या डेंगळे पुलावरून काही तरूणांनी दुपारच्या वेळेस नदीमध्ये उडी मारून पोहण्याचा प्रयत्न केला. यातील एक तरूण पाण्याच्या प्रचंड प्रवाहात बुडाला. निखिल थोरात असे बुडालेल्या तरूणाचे नाव असून, तो बेपत्ता आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.बुडालेल्या तरूणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना शोध कार्यात अडचणी आल्या. दरम्यान मुठा नदीतून पाणी कमी झालेले नाही, त्यामुळे अद्याप बेपत्ता झालेल्या तरूणाला शोधण्यात यश आलेले नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details