पुणे: राज्यातील राजकीय संस्कृती हा एक चिंतेचा विषय झाला आहे. सगळ्या पक्षांनी एकत्र बसून काय बोलावे काय बोलू नये यावर चर्चा करणे गरजेच आहे. कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. आता त्यावर दिलगिरी व्यक्त करत हा विषय संपावे असे वाटते. जुन्या काळात यादी काढली, तर अब्दुल सत्तार यांचे समर्थन असे होईल जे मला करायचे नाही, असे चंद्रकांत पाटील पालकमंत्री ( Chandrakant Patil Guardian Ministe ) यांनी म्हटले.
Chandrakant Patil : महाराष्ट्रात खोके संस्कृतीची सुरुवात राष्ट्रवादीकडून- चंद्रकांत पाटील - Chandrakant Patil criticizes Sharad Pawar
राज्यातील राजकीय संस्कृती हा एक चिंतेचा विषय झाला आहे. जुन्या काळात यादी काढली, तर अब्दुल सत्तार यांचे समर्थन असे होईल जे मला करायचे नाही, असे चंद्रकांत पाटील पालकमंत्री ( Chandrakant Patil Guardian Ministe ) यांनी शरद पवारांवरती ( Sharad Pawar ) टीका केली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना टारगेट करणे चुकीचे : खोके संस्कृती महाराष्ट्रात सुरू कोणी केली. एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना टार्गेट करणे चुकीचे आहे, असे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी म्हटले आहे. या सत्ता समीकरणमध्ये असे काही झाले नाही. खोके सोडा, राणे, भुजबळ, नाईक यांना बाहेर कोणी काढले, असे म्हणत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. हर हर महादेव या चित्रपटाच्या सोबत पाण्यावर सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ज्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा टेंभा मिरवायचे त्यांनी कायदा हातात घेणे योग्य नाही. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, असे म्हणत त्याने जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awad ) यांना सुद्धा टीका केली आहे.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या प्रतिसादाबद्दल बोलताना :राहुल गांधी यांना १३ ते १४ वेळा अशा प्रकारे प्रमोट करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही.त्याचे काही खासदार ५०-६० वर जात नाहीत. प्रत्येक जण आपला पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करत असतो. प्रतिक्रिया चंद्रकांत दादा पाटील यांनी दिलेली आहे. देशभरामध्ये जागतिक पोलीस उत्सवाच्या आयोजन करण्यात येणार आहे. पु ल देशपांडे यांच्या लिखाणावर आणि साहित्यावर आधारित या उत्सवाला जागतिकस्तरावर नेण्यासाठीच आयोजन करण्यात आलेला असून त्याचे प्रमुख निमंत्रक म्हणून चंद्रकांत दादा पाटील यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.