न्यायालयाने सुनावलेल्या आदेशाबद्दल सांगताना बचाव पक्षाचे वकील पुणे :एटीएसकडून अटक करण्यात आलेल्या चारही संशयित दहशतवाद्यांना दहशतवाद विरोधी पथकाकडून आज (शनिवारी) न्यायालयात विशेष अतिरिक्त न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने संबधित चार आरोपींच्या पोलीस कोठडीत 11 ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. यावेळी एटीएस अधिकाऱ्यांनी केलेल्या चार संशयित दहशतवाद्यांच्या चौकशीत या दहशतवाद्यांचा इसिस आणि अल सुफा या बंदी घातलेल्या संघटनेशी संबंध आढळला. त्यांचा देशातील अनेक भागात बॉम्बस्फोटाचा कट होता आणि तो उघडकीस आल्याची माहिती दिली आहे. आज न्यायालयात याबाबत सरकारी पक्षातर्फे अॅड. विजय फरगडे तर बचाव पक्षातर्फे अॅड. यशपाल पुरोहित यांनी युक्तिवाद केला.
दहशतवाद्यांकडून बॉम्बस्फोटाची चाचणी :कोथरूड येथे दुचाकी चोरण्याच्या प्रयत्नात असताना पुणे पोलिसांनी महंम्मद इम्रान महंम्मद युसूफ खान (वय 23 वर्षे) आणि महंम्मद युनूस महंम्मद याकूब साकी (वय 24 वर्षे, दोघेही राहणार- मध्य प्रदेश) यांना अटक केली होती. तर तिसरा जोडीदार हा फरार झाला होता. त्याचा शोध सुरू आहे. पकडण्यात आलेल्या या दोघांचा ताबा एटीएसने घेतला. यानंतर या दोघांनी पुणे, कोल्हापूर आणि सातारा येथील जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याचे उघडकीस आले आहे.
दहशतवाद्यांना भाड्याने खोली देणे भोवले :त्यांनतर एटीएसकडून करण्यात आलेल्या तपासात या दोघांना पुण्यातील कोंढवा भागात राहण्यास भाड्याने खोली देणारा अब्दुल कादीर दस्तगीर पठाण (वय 32 रा, कोंढवा) याला तर यांना आर्थिक मदत करणारा रत्नागिरी येथील मेकॅनिकल इंजिनीअर सिमाब नसरुद्दीन काझी (वय 27) याला देखील एटीएसने अटक केली होती. या चौघांना आज न्यायालयात हजर करण्यात आल्यावर त्यांना 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
दहशतवाद्यांना आर्थिक मदत :या दहशतवाद्यांनी पुण्यासह काही शहरात घातपाताचा कट आखल्याचे एटीएस तपासात निष्पन्न झाले आहे. या कटात झुल्फिकार अली बडोदावाल्याचा सहभाग असल्याचेही समोर आले. आता त्याला देखील एटीएसने ताब्यात घेतले आहे. बडोदावाला याने पठाण व काझीच्या माध्यमातून दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक मदत केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एटीएसने त्याला 'एनआयए'च्या गटातून वर्ग करून घेतले आहे.
हेही वाचा:
- Terrorist Arrested: सुफा दहशतवादी संघटनेतील दहशतवाद्यांना पुण्यात अटक; गस्तीवरील दोन पोलिसांनी धाडसाने कशी कारवाई केली?
- अल कायदाचा दहशतवादी मोहम्मद कालिमुद्दीन एटीएसच्या ताब्यात
- Suspect Terrorist Arrested : अल कायद्याच्या संशयित दहशतवाद्याला बेंगळुरूमध्ये अटक