पुणे :देशाच्या पंतप्रधानांना जीवे मारण्याचीधमकी देणारा ई-मेल आल्यानंतर पुणे पोलिसांनी अलंकार पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उडवून देण्याच्या धमकीसह देशभरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकीही या ईमेलमध्ये देण्यात आली आहे.
अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा :पुणे शहर पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला 6 ऑगस्टला दोन वाजताच्या सुमारास पिरंगूट तालुक्यातील भूगाव येथील राहुल तायाराम दुधाणे यांनी फोनवरुन करुन त्यांना थ्रेड कॉल आल्याची माहिती दिली. दिनानाथ मंगेशकर या रुग्णालयात जाऊन ते त्या कॉलरला भेटले, असता त्याने तक्रारदाराच्या वेबसाईटवर धमकी दिली. यावेळी सदर कॉलरने दोन गटात वाद निर्माण करणारा मेसेजही पाठवला आहे. त्यामुळे पोलिसांनी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन आरोपीचा शोध सुरु केला आहे. पुण्यातील दीनानाथ हॉस्पिटलमध्ये 'मोखीम' या नावाने ई मेल करुन ही धमकी देण्यात आली आहे. सोशल मीडियावर विदेशातून मेसेज करत एकाने ही धमकी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
काय आहे धमकी :दीनानाथ रुग्णालयात आलेल्या धमकीच्या मेलमध्ये ' मी अनेक दहशतवादी संघटनांना फंडिंग करत असून विशिष्ट धर्माच्या लोकांना देशातून नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहे.' अशा आशयाचा मजकूर या धमकीच्या मेलमध्ये नमूद करण्यात आले आहे. देशात अनेक ठिकाणी घातपात घडवून आणण्याची धमकीसुद्धा आरोपी 'मोखीम' या नावाने जीमेल वापरणाऱ्या व्यक्तीने दिली आहे. या सगळ्या प्रकारानंतर धमकीचा मेसेज आलेल्या व्यक्तीने पुणे शहर पोलीस दलाच्या कंट्रोल रूमला माहिती दिली. त्यांच्या तक्रारीवरुन अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अलंकार पोलीस पुढील तपास करत आहेत.
धमक्यांचे प्रमाण वाढले : गेल्या काही दिवसांमध्ये अशा पद्धतीच्या धमकीच्या मेल, मेसेजेस तसेच फोन कॉल्सचे प्रमाण वाढले आहे. यातल्या बहुसंख्य धमक्या या बनावट असतात. तरीदेखील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस, गृह विभाग तडजोड करु शकत नाही. परिणामी, आधीच 24 तास सतर्क राहाव्या लागणाऱ्या पोलीस खात्यावर जबाबदारीचे ओझे आणि कामाचा ताण यात वाढ झाली आहे.
हेही वाचा -
- PM Narendra Modi Threat Case : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी; आरोपीला अहमदाबादमधून अटक
- Modi Kerala Visit: केरळ दौऱ्यात पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी; भाजप कार्यालयात आले पत्र