महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिवंगत समीर चासकर व युवराज शिंदे प्रतिष्ठानतर्फे राजगुरूनगर येथे रक्तदान शिबिर

दिवंगत समीर चासकर व युवराज शिंदे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन राजगुरुनगर येथे करण्यात आले होते.

blood donation camp organise by sameer chaskar and yuvraj shinde pratishtha in pune
पुणे : दिवंगत समीर चासकर व युवराज शिंदे प्रतिष्ठाततर्फे राजगुरूनगर येथे रक्तदान शिबिर

By

Published : Dec 1, 2020, 8:10 PM IST

पुणे - 'रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान' ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून दिवंगत समीर चासकर व युवराज शिंदे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन राजगुरुनगर येथे करण्यात आले होते. यावेळी 313 तरुणांनी रक्तदान केले.

चार वर्षांपासून सुरू आहे रक्तदान शिबिर -

मागील चार वर्षांपूर्वी समीर चासकर व युवराज शिंदे या दोन्ही तरुणांचा अपघाती दुदैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या दुदैवी मृत्यूनंतर राजगुरुनगर येथे स्व. समीर चासकर आणि स्व. युवराज शिंदे युवा प्रतिष्ठाणची स्थापना करून मागील चार वर्षांपासून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या रक्तदान शिबिरात खेड तालुक्यातील तरुणवर्ग मोठ्या संख्येने रक्तदान करून आपले कर्तव्य बजावत आहे. या रक्तदान शिबिरातून घेण्यात येणारे रक्त गरजूंना तत्काळ उपलब्ध करुन देण्यात येते.

चार वर्षांपासून रुग्णवाहीकेचीही सेवा -

पुणे नाशिक महामार्ग, भिमाशंकर महामार्ग तसेच खेड तालुक्यातील गावखेड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अपघात होतात. यावेळी तत्काळ रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. यासाठी मागील चार वर्षांपासून गोरगरिबांच्या सेवेत दिवंगत समीर चासकर आणि युवराज शिंदे युवा प्रतिष्ठाणच्या माध्यमातून चार रुग्णवाहिकेची सुविधा माफक दरात उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

हेही वाचा - डॉ. शीतल आमटे आत्महत्या प्रकरण; प्रसिद्धीपत्रकामुळे आमटे परिवाराचे वाद चव्हाट्यावर

ABOUT THE AUTHOR

...view details