महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दृष्टीहीन असताना त्याने केवळ आवाज व स्पर्शाच्या जोरावर कातळधार रॅपलिंग; माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा मानस

जिद्दीच्या जोरावर व्यक्ती काय करू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण एका तरुणाने घालून दिले आहे. जन्मताच दृष्टीहीन असलेल्या तरुणाने त्यावर मात करत केवळ आवाज आणि स्पर्शाचा जोरावर लोणावळा येथील कातळधार धबधबा येथे रॅपलिंग करत तब्बल ४५० फुट खोल खाली उतरला आहे.

By

Published : Jul 26, 2019, 10:38 AM IST

Updated : Jul 26, 2019, 12:38 PM IST

दृष्टीहीन असताना त्याने केले आवाज आणि स्पर्शाच्या जोरावर रॅपलिंग

पुणे - जिद्दीच्या जोरावर व्यक्ती काय करू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण एका तरुणाने घालून दिले आहे. जन्मताच दृष्टीहीन असलेल्या तरुणाने त्यावर मात करत केवळ आवाज आणि स्पर्शाचा जोरावर लोणावळा येथील कातळधार धबधबा येथे रॅपलिंग करत तब्बल ४५० फुट खोल खाली उतरला आहे. या ठिकाणी डोळस व्यक्तीला खाली उतरण्यासाठी २० मिनिट लागतात. मात्र, या तरुणाने अवघ्या चार मिनिटात हे काम फत्ते केले आहे. त्यामुळे त्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. अजय ललवाणी (वय २४, रा. उल्हासनगर, मुंबई) असे या तरुणाचे नाव आहे. भविष्यात त्याचा माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा मानस आहे.

दृष्टीहीन असताना त्याने केवळ आवाज व स्पर्शाच्या जोरावर कातळधार रॅपलिंग; माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा मानस

अंध म्हणून तो इतर व्यक्तींसारखा घरी बसला नाही किंवा हताश झाला नाही. जन्मताच तो दृष्टीहीन आहे. मात्र, तरीदेखील त्याला दिसत नसल्याने कोणतीच अडचण आली नाही. त्याच्या या कामगिरीमुळे तरुणांना प्रेरणा मिळत आहे. तो सर्व प्रकारचे खेळ खेळतो. यात क्रिकेट, फुटबॉल, सायकलिंग, ज्यूदो हे त्याचे आवडीचे प्रकार आहेत. तो मुंबई महानगर पालिकेत टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम करतो. तसेच आपल्या कुटुंबाची आर्थिक मदत करतो आहे.

अजयचे वडील हे हातगाडीवर फळ विकतात तर आई गृहिणी तर चार भाऊदेखील आहेत. सर्व कुटुंब त्याच्या यश-अपयशाच्या वेळी खंबीर पाठीशी उभे असते असे तो सांगतो. त्याला साहसी गोष्टी करायची लहानपणापासून आवड आहे. नेत्रहीन असल्याने अनेकदा विचार बदलले. मात्र, आपण करू शकतो या जिद्दीने पुन्हा पेटून उठलो आणि शक्य तितक्या प्रयत्नांनी खेळ खेळत राहिलो, असे त्याने 'ईटीव्ही भारत' सोबत बोलताना सांगितले.

अजयने आत्तापर्यंत दोन वॉटर फॉल, कोंढाणा, प्रताप गड सर केला आहे. त्याला ज्यूदोच्या राष्ट्रीय स्पर्धेत सिल्व्हर आणि ब्रांस बदक मिळाली आहेत. दरम्यान, हे सर्व करत असताना त्याला अडचणी खूप आल्या. मात्र, त्यावर तो हताश न होता मात करत गेला. दृष्टीहीन असल्याने जगावेगळे काहीतरी करायचे हे ठरवलेले होते. त्यानुसार त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. भविष्यात माउंट एव्हरेस्ट सर करायचा त्याचा मानस आहे.

Last Updated : Jul 26, 2019, 12:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details