पुणे - लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवार २३ मे रोजी होणार असून, राज्यात मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. एक्झिट पोलमध्ये दाखवलेल्या पेक्षा काँग्रेसची स्थिती खूप चांगली असणार आहे. राज्यात आघाडीला २५ जागा मिळतील, असे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे.
राज्यात आघाडीला २५ जागा मिळतील - बाळासाहेब थोरात - एक्झिट पोल
मंगळवारी पुण्यात आयोजित एका कार्यक्रमासाठी बाळासाहेब थोरात आले होते. त्यावेळी ते बोलत होते
ते पुढे म्हणाले, महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षपद आणि गटनेते पदाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांपैकी मी एक आहे, पक्ष ज्याच्यावर जबाबदारी टाकेल त्याने ती पूर्ण केली पाहिजे. अशी अपेक्षा व्यक्त करत विधान सभेलाही राष्ट्रवादी सोबत आघाडी निश्चित होईल असेही थोरात यांनी यावेळी सांगितले.
ईव्हीएम मशीन बाबत व्यक्त केल्या जात असलेल्या शंका रास्त आहेत. खरतर बॅलेट पेपरवरच निवडणूका झाल्या पाहिजेत, असे सांगत लोकसभा निवडणुकीत मनसेने खूप चांगल काम केले आहे असे देखील थोरात यांनी आवर्जून सांगितले.