महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काँग्रेस कार्यकर्त्यांकडून  आमदार संग्राम थोपटे यांच्या फोटोला फासले काळे - photo of Sangram Thopte at the Congress Bhawan

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने संग्राम थोपटे नाराज आहेत. त्यांच्या 25 ते 30 समर्थाकांनी नाराजी व्यक्त करण्यासाठी मंगळवारी शिवाजीनगर येथील काँग्रेस भवन येथे जोरदार राडा केला होता. फोटोला काळे फासून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

ink
पुण्यात काँग्रेस भवन येथे लावलेल्या बॅनरवरील संग्राम थोपटे यांच्या फोटोला फासले काळे

By

Published : Jan 1, 2020, 5:18 PM IST

पुणे - काँग्रेस भवन येथे लावलेल्या बॅनरवरील संग्राम थोपटे यांच्या फोटोला काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे फासले आहे. काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने यांच्या समर्थकांनी पुण्यात काँग्रेस भवनावर हल्ला केला होता. त्याच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज(1 जानेवारी) हे पाऊल उचलले आहे.

पुण्यात काँग्रेस भवन येथे लावलेल्या बॅनरवरील संग्राम थोपटे यांच्या फोटोला फासले काळे

हेही वाचा -'आमदार थोपटेंसाठी भाजपची दारे उघडी'

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने संग्राम थोपटे नाराज आहेत. त्यांच्या 25 ते 30 समर्थाकांनी नाराजी व्यक्त करण्यासाठी मंगळवारी शिवाजीनगर येथील काँग्रेस भवन येथे जोरदार राडा केला होता. यावर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच संबंधितांवर कारवाईची मागणीदेखील केली आहे. फोटोला काळे फासून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

ABOUT THE AUTHOR

...view details