पुणे- पिंपरी-चिंचवड शहराच्या उपमहापौरपदी सत्ताधारी भाजपाचे निष्ठावंत केशव घोळवे यांची बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादीच्या निकिता कदम यांनी माघार घेतल्याने घोळवे यांची बिनविरोध निवड झाली आहे. माजी उपमहापौर तुषार हिंगे यांनी ऑक्टोबर महिन्यात तडकाफडकी उपमहापौर पदाचा राजीनामा दिला होता.
पिंपरी-चिंचवड शहराच्या उपमहापौरपदी भाजपाचे निष्ठावंत घोळवे यांची निवड - महापौर घोळवे बिनविरोध
एकेकाळी राष्ट्रवादीची हुकूमत असलेल्या पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या उपमहापौरपदी मुंडे समर्थक आणि भाजपाचे निष्ठावंत घोळवे यांची निवड झाली आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवाराने माघार घेतल्याने घोळवे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
उपमहापौरपदी भाजपाचे निष्ठावंत घोळवे यांची निवड
विनंतीनंतर राष्ट्रवादीची माघार-
महापालिकेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात विशेष सभेत निवडणूक प्रक्रिया पार पडली. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. सव्वा अकरा वाजता अर्ज माघारी घेण्यासाठी पंधरा मिनिटांचा कालावधी दिला होता. सभागृह नेते नामदेव ढाके, केशव घोळवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला अर्ज माघार घेण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देत निकिता कदम यांनी माघार घेतली.
Last Updated : Nov 6, 2020, 3:55 PM IST