महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्याच्या ग्रामीण भागात भाजपचे राज्य सरकारविरोधात आंदोलन - पुणे भाजप सरकारविरोधी आंदोलन

राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्याने पुणे व मुंबई परिसरातून हजारोंच्या संख्येने नागरिक ग्रामीण भागात येत आहेत. मात्र, राज्य सरकारकडून कुठल्याच उपाययोजना होत नाहीत. त्यामुळे पुण्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजपने तीव्र आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला.

BJP Agitation
भाजप निषेध आंदोलन

By

Published : May 23, 2020, 10:42 AM IST

पुणे - ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून पुणे-मुंबई परिसरातील रेड झोनमधील नागरिक मोठ्या संख्येने खेड, आंबेगाव, जुन्नर परिसरात येत आहेत. मात्र, राज्य सरकारकडून कुठल्याच उपाययोजना होत नाहीत. त्यामुळे पुण्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजपने तीव्र आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला.

पुण्याच्या ग्रामीण भागात भाजपचे राज्य सरकारविरोधात आंदोलन

खेड, आंबेगाव, जुन्नर परिसरात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी प्रशासनाकडून कडक उपाययोजना करण्यात येत होत्या. मात्र, राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्याने पुणे व मुंबई परिसरातून हजारोंच्या संख्येने नागरिक ग्रामीण भागात येत आहेत. या नागरिकांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र, क्वारंटाईनच्या नियमांचे पालन होत नाही त्यामुळे कोरोनाचा समुह संसर्ग वाढण्याची भिती निर्माण झाली आहे. यावर उपाययोजना करण्यास राज्यसरकारला अपयश आले असल्याचे आरोप भाजपने केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details