यवतमाळ- महाविकास आघाडीचे सरकार जेव्हापासून सत्तेवर आले, तेव्हापासून राज्यातील महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहेत, असा आरोप करत संपुर्ण राज्यात भाजप महिला आघाडीच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. याअंतर्गत आज यवतमाळ जिल्ह्यातही आज भाजप महिला आघाडीच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकारवर हल्लाबोल करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
महिलांवरील अत्याचार कमी करण्यात ठाकरे सरकार अपयशी, यवतमाळमध्ये भाजप महिला आघाडीचा हल्लाबोल - yavatmal women agitation news
सत्तेवर येण्यापूर्वी ठाकरे सरकारने राज्यातील महिलांवरील अत्याचार विरोधात कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेवर येतात दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता करण्यात आलेली नाही. त्यामुळे हे सरकार महिलांची सुरक्षा करण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत यवतमाळमध्ये महिला कार्यकर्त्यांनी आज आंदोलन केले.
देशात ज्या ठिकाणी भाजप सरकार सत्तेवर आहेत त्या ठिकाणी महिलावरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. मागील दहा दिवसात अशा अत्याचारांच्या घटनेत वाढ झाली आहे. महाराष्ट्रातही अशा घटना घडल्या असून राज्य शासन पूर्णतः या घटनांना आळा घालण्यास अपयशी ठरत आहे. आज महिला, लहान मुली ह्या पूर्णपणे असुरक्षित आहे. रोज कुठे ना कुठे अत्याचाराच्या घटना घडत आहेत. इतकेच नव्हे तर, कोविड रुग्णालयात देखील महिलांवरील अत्याचार होत आहेत. असे असताना सरकार कोणतीही ठोस पावले उचलताना दिसत नाही. असा आरोपही यावेळी करण्यात आला.
सत्तेवर येण्यापूर्वी ठाकरे सरकारने राज्यातील महिलांवरील अत्याचार विरोधात कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. महिलांवरील अत्याचार आम्ही सहन करणार नाही अशी त्यांची भूमिका होती. मात्र सत्तेवर येतात दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता करण्यात आलेली नाही. त्यामुळे हे सरकार महिलांची सुरक्षा करण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत महिला कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला.