महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bjp Protest Pune सोन्याच्या चमच्याने बदामाचा ज्यूस पिलेल्या आदित्य ठाकरेंना महाराष्ट्राचे दुःख काय कळणार - चंद्रशेखर बावनकुळे - आदित्य ठाकरे लेटेस्ट बातमी

पाकिस्तानचे परराराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो (Pakistan Minister Bilawal Bhutto Controversial Statement) याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Pm Narendra Modi ) यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने पुण्यात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule Criticized To Aditya Thackeray ) यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. सोन्याच्या चमच्याने बदामाचा ज्युस पिलेल्या आदित्य ठाकरेंला महाराष्ट्राचे दुःख काय कळणार अशी टीका यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

Chandrashekhar Bawankule
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

By

Published : Dec 17, 2022, 6:09 PM IST

Updated : Dec 17, 2022, 6:40 PM IST

पुणे -महाविकास आघाडीतील ( Maha Vikas Aghadi ) नेत्यांना जनतेचे प्रश्न कळू शकत नाहीत. त्याप्रमाणेच सोन्याच्या चमच्याने बदामाचा ज्यूस पिलेल्या आदित्य ठाकरेंना ( Shiv Sena Leader Aditya Thackeray ) महाराष्ट्राचे दुःख काय कळणार, असा हल्लाबोल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule Criticized To Aditya Thackeray ) यांनी केला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे दुःख आम्हाला कळते, असे कोणी म्हणू नये, अशी टीकाही बावनकुळे यांनी केली.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो ( Bilawal Bhutto Controversial Statement On Pm Modi) याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याचा निषेध करण्यासाठी आज चंद्रशेखर बावनकुळे ( Bjp State President Chandrashekhar Bawankule ) यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात निषेध आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते माध्यमाशी बोलत होते

महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकलीमहाविकास आघाडीच्या ( Maha Vikas Aghadi ) वतीने आज भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. परंतु महापुरुषाच्या नावावर भावनिक मुद्दे घेऊन हे राजकारण करत आहेत. यांच्याकडे दुसरा मुद्दा नाही ते विकासाच्या मुद्द्यावर लढू शकत नाहीत. आमच्या पायाखालची वाळू सरकली म्हणणारे यांना काय माहित आम्ही 50 वर्ष विरोधी पक्षात काम केले. आमच्या पायाखालची वाळू तुम्ही काढू शकत नाही. तुमच्या पायाखालची वाळू सरकली आहे, अशी टीकाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या महामोर्चावर ( Maha Vikas Aghadi Maha Morcha )केली आहे.

पुढच्या वेळी घुसून मारूपाकिस्तानची अर्थव्यवस्था दिवाळखोरीत निघाली आहे. पाकिस्तान आतंकवाद्यांना ( terrorism In Pakistan) पोसत असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे कुठलेही आरोप करून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न पाकिस्तान करते. परंतु नरेंद्र मोदींचे ( Pm Narendra Modi ) नेतृत्व जगाने मान्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या पोटात दुखत आहे. यावेळेस फक्त निषेध करत आहोत, पुढच्या वेळेला घुसून मारू असा, इशारा सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिला आहे.

आमच्या विरोधात रिंगणात येऊन बघा2024 च्या निवडणुकीमध्ये आम्ही तयारीला लागलो आहोत. निवडणुका जवळ येत आहेत, त्यावेळेसच दूध का दूध आणि पाणी का पाणी कळेल. त्यामुळे आमच्या पायाखालची वाळू सरकली, म्हणण्यापेक्षा 2024 ला रिंगणात येऊन बघा, असा इशारा सुद्धा त्यांनी महाविकास आघाडीला दिला आहे.

Last Updated : Dec 17, 2022, 6:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details