महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुन्हा काही नेते भाजपच्या वाटेवर; शरद पवारांनी मानसिक तयारी ठेवावी - चंद्रकांत पाटील - राष्ट्रवादी

इतर पक्षातील नेत्यांना ईडीची भिती दाखवून भाजपमध्ये आणले जात असल्याचा आरोप शरद पवारांनी केला होता. मात्र, त्यांनी शिवसेनेतून छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक यांना पळवले होते. त्यावेळी ईडीचा वापर केला होता का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

पुन्हा काही नेते भाजपच्या वाटेवर; शरद पवारांनी मानसिक तयारी ठेवावी - चंद्रकांत पाटील

By

Published : Aug 2, 2019, 6:13 PM IST

पुणे - राष्ट्रवादीमधून ३ आमदार भाजपमध्ये आल्याचा धसका शरद पवारांनी घेतला आहे. मात्र, आता आणखी लोक पक्षप्रवेश करणार आहेत. त्यामुळे शरद पवारांनी मानसिक तयारी ठेवावी, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. शहरातील श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने चंद्रकांत पाटील यांचा वार्तालाप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

पुन्हा काही नेते भाजपच्या वाटेवर; शरद पवारांनी मानसिक तयारी ठेवावी - चंद्रकांत पाटील

इतर पक्षातील नेत्यांना ईडीची भिती दाखवून भाजपमध्ये आणले जात असल्याचा आरोप शरद पवारांनी केला होता. मात्र, त्यांनी शिवसेनेतून छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक यांना पळवले होते. त्यावेळी ईडीचा वापर केला होता का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना योग्य संधी दिली जाईल -
भाजपमध्ये सुरू असलेल्या मेगाभर्तीमुळे भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होईल, अशी चर्चा केली जात आहे. मात्र, भाजपमध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय केला जात नाही. त्यांना योग्य ती संधी दिली जात असल्याचे पाटील म्हणाले. तसेच भाजपमध्ये प्रवेश देताना नेत्यांना पारखून प्रवेश दिला जात आहे, असेही सांगायला ते विसरले नाहीत. भाजपप्रवेशामुळे उमेदवारांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे युती होणार नाही, अशा चर्चा रंगल्या आहे. मात्र, भाजप-सेनेची युती होणारच आहे, असे ठामपणे त्यांनी सांगितले.

कुठल्याही पद्धतीने निवडणूक घेतल्यास भाजपच जिंकेल -
ईव्हीएम मशीनसंदर्भांमध्ये विरोधकांकडून आरोप केले जात आहेत. मात्र, निवडणुकीसाठी कुठल्या पद्धतीने मतदान घ्यायचे? हा निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. भाजप बॅलेट पेपरच नाहीतर हात वर करून मतदान घेण्याच्या पद्धतीला देखील तयार आहे. कुठल्याही पद्धतीनुसार मतदान घेतले तरी भाजपच जिंकेल, असा दावा देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला.

पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढणार -
पक्षाने दिलेला आदेश मी पाळच असतो. पक्षाने निवडणूक लढवण्यास सांगितले तर महाराष्ट्रात कुठूनही निवडणूक लढवणार असल्याचे पाटील म्हणाले. तसेच आजपर्यंत कुठलीही निवडणूक हरलेली नाही. त्यामुळे ही निवडणूक सुद्धा जिंकेल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details