महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अनिल देशमुख दोषी म्हणूनच त्यांना जामीन नाही - चंद्रकांत पाटील

वारंवार शाहरुख खानच्या मुलाचे विषय असू दे किंवा अनिल देशमुख यांचा विषय असू दे सदासर्वकाळ तुम्ही भाजपवर टीका करत असतात. न्यायालयदेखील भाजपमध्ये सामिल झाले आहे, असे तुम्हाला म्हणायचे आहे का? न्यायालय जेव्हा 24 दिवस शाहरुख खानच्या मुलाला जमीन देत नाही त्याच पद्धतीने अनिल देशमुख यांना जामीन देत नाही.

chandrakant patil
चंद्रकांत पाटील

By

Published : Nov 6, 2021, 6:10 PM IST

पुणे - महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख दोषी आहेत, म्हणूनच त्यांना जामीन मिळाला नाही, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. ते येथे माध्यमांशी बोलत होते.

माध्यमांशी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

वारंवार शाहरुख खानच्या मुलाचे विषय असू दे किंवा अनिल देशमुख यांचा विषय असू दे सदासर्वकाळ तुम्ही भाजपवर टीका करत असतात. न्यायालयदेखील भाजपमध्ये सामिल झाले आहे, असे तुम्हाला म्हणायचे आहे का? न्यायालय जेव्हा 24 दिवस शाहरुख खानच्या मुलाला जमीन देत नाही त्याच पद्धतीने अनिल देशमुख यांना जामीन देत नाही. याचा अर्थ असा की प्रकरणात काहीतरी दम आहे. इतक्या उच्चस्तरीय नेत्याच्या बाबतीत न्यायालय खूप फुंकून फुंकून पिते. अनिल देशमुख दोषी आहे म्हणुनच त्यांचा जामीन झालेला नाही. चौकशी समितीने चौकशी करून शिक्षा दिली पाहिजे तरच सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास बसेल, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

घटनेचा चौकशी अहवाल सगळ्यांना कळावा -

नगरची घटना जशी दुर्दैवी आहे तशी विरोधी पक्षाचा नेता म्हणून ती कोणी घडवली आहे, असं मी म्हणणार नाही. दुर्दैवी घटना घडवणे इतकी महाराष्ट्राची संस्कृती खाली गेलेली नाही. मात्र, घटना घडल्यानंतर दोन ते तीन दिवस त्याची खूप चर्चा होते. नंतर तो विषय कुठं गायब होतो कळतच नाही. भंडारा, नाशिक, मुंबईची घटना घडल्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली होती. त्या समितीचा निष्कर्ष काय निघाला. त्या निष्कर्षाच्या आधारे काही काम करणार आहेत का नाही? ते काम करण्याचा काही टाईमबॉम्ब रिपोर्ट मिळणार आहे का नाही? नगरच्या घटनेत सगळ्यांनी मदत कार्य केले पाहिजे. मात्र, या आगीच्या घटनेची जी चौकशी कराल, त्याचा अहवाल लोकांपर्यंत कळलं पाहिजे. आग का आग होती? आणि कोणामुळे घडली आहे? जनतेला कळायला हवे, यानंतरच ते रुग्णालय सुरू करायला हवे, असे मत त्यांनी अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आग दुर्घटनेबाबत बोलताना व्यक्त केले.

भारतीय जनता पक्ष म्हणून हा विषय लावून धरणार आहोत

घटना घडल्यानंतर दोन ते तीन दिवस त्या घटनेवर खूप चर्चा केली जाते. विरोधी पक्ष म्हणून आम्ही देखील सरकारला जाब प्रश्न विचारतो. मात्र, एक ते दोन दिवसानंतर शांत होतो. आता नगरच्या घटनेत आम्ही शांत बसणार नाही. ही काही मानवनिर्मित घटना नाही. नेमके काय झाले आहे? दिवाळीत 11 जणांचे जीव गेले आहेत. आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून हा विषय लावून धरणार आहोत. मदत जी काही लागणार आहेत ती मदत करायला आम्ही तयार आहोत. मात्र, आगीचे कारण काय यासाठी आम्ही शांत बसणार नाही, असेदेखील त्यांनी यावेळी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details