पुणे :भाजप प्रदेश कार्यकारिणीची 18 तारखेला पुण्यामध्ये बैठक होत असून या बैठकीला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित राहणार आहेत. राज्यभरातील बाराशे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी आज पुण्यात दिली आहे. तीन दिवस जेपी नड्डा पुण्यात राहणार असून, तीन दिवस वेगवेगळ्या बैठका घेणार आहे. यामध्ये भाजपा आमदार, खासदाराची सुद्धा बैठक स्वतः जे पी नड्डा घेणार आहेत.
प्रदेश कार्यकरणी करण्याच्या बैठकीला महत्त्व :पुण्यात बोलताना काल देवेंद्र फडवणीस म्हणाले की, येणाऱ्या वर्ष हे निवडणुकांचे वर्ष आहे. त्यामुळे भाजपा प्रदेश कार्यकरणी होणारी बैठक आहे, ती महत्त्वाची मानली जात आहे. कर्नाटक राज्याच्या निकाल लागल्यानंतर भाजपामध्ये एक अस्वस्थता निर्माण झालेली आहे. त्याचा फटका महाराष्ट्रात बसू नये यासाठी स्वतः जे.पी नड्डा या ठिकाणी उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे या प्रदेश कार्यकरणी करण्याच्या बैठकीला महत्त्व प्राप्त झाला असून, कार्यकर्त्यांसोबत खासदार आमदारांना सुद्धा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देणार असल्याची माहिती जगदीश मुळीक यांनी दिली आहे .