पुणे- शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी राजकीय भीतीच्या पलीकडे जाऊन त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. त्यांची ही प्रतिक्रिया बोलकी आहे. हिंदुत्वावर आधारित भाजप शिवसेनेची युती होती. ती युती पुढेही होऊ शकते. कारण हिंदुत्व हा आपला श्वास आहे आणि प्रताप सरनाईक यांनी जे पत्रात म्हटलं आहे ते सर्वांच्या मनातील बोलले आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपाची युती झाल्यास भाजपाच्या कार्यकर्त्यांनाही आनंद होईल, असे मत भाजपचे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केले.
भविष्यात जर भाजप सेनेत युती झाली तर भाजपच्याही कार्यकर्त्यांना आनंद - गिरीश बापट - BJP will consider joining hands
शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भापशी जुळवून घ्यावे, असे मत व्यक्त केले. त्यावर बोलताना भाजप शिवसेना ही नैसर्गिक युती होती पण काही कृत्रिम लोकांनी ती तोडली. भविष्यात जर भाजप सेनेत युती झाली तर भाजपच्याही कार्यकर्त्यांना आनंद होईल, असं मतही खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केले.

महापालिकेत पुन्हा आमचीच सत्ता
पुणे महापालिकेत आम्ही सिद्ध आहोत. आगामी निवडणुकीत हे सिद्ध होईल, दूध का दूध पाणी का पाणी होईल. महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर या महापालिकेत भारतीय जनता पक्षाची पुन्हा सत्ता येईल. ज्यांना आमच्या बरोबर यायचे आहे, त्यांचे स्वागत आहे. पण राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेला आमचे जास्त प्राधान्य असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यांच्यातच ग्यानबाची मेक -गिरीश बापट
राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नसून पश्चिम महाराष्ट्रातील एक छोटी पार्टी आहे. ती काही अखिल भारतीय पक्ष नाही. अजित पवार हे शरद पवार यांच ऐकत नाहीत, हे मला माहित होते. पण दादांचे कार्यकर्ते ऐकत नाही हे मला दादांकडूनच कळाले, त्यामुळे या बोलण्यातच सगळी ग्यानबाची मेक आहे, असा टोला देखील बापट यांनी यावेळी अजित पवारांना लगवाला आहे.