पुणे : खासदार गिरीश बापट यांचे दोन दिवसांपूर्वी (29 मार्च) निधन झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षातील नेते मंडळी हे त्यांच्या घरी येत आहेत. दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर लोकसभेची पोटनिवडणूक लागणार असल्याच्या चर्चांना सुरूवात झाली आहे. यासाठी काँग्रेसने तयारी सुरू केली असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेस लोकसभेसाठी इच्छुक आहे, असे काँग्रेसचे नेते विजय वडे्टीवार यांनी म्हटल्यामुळे भाजपचे उपाध्यक्ष संजय काकडे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या दाव्यावर काँग्रेस महाराष्ट्राला यूपी-बिहार करू पाहात आहे. तिथे देखील एवढी घाई करत नसतील, अशी टीका यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी केली आहे.
Sanjay Kakade Critics on Congress : वडेट्टीवारांच्या विधानावरून संजय काकडे भडकले; म्हणाले, 'काँग्रेस महाराष्ट्राचा यूपी-बिहार...' - विजय वडेट्टीवार
पुणे लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणुकी संदर्भात कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या दाव्यावर काँग्रेस महाराष्ट्राला यूपी-बिहार करू पाहात आहे. तिथे देखील एवढी घाई करत नसतील, असे काकडे म्हणाले आहेत.
निर्लज्जपणाचा कळस : पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनाला तीन दिवस झाले आहेत. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी पुण्यातील जागा ही काँग्रेसची असल्याचे विधान केले आहे. यावर संजय काकडे यांना विचारले असता त्यांनी वडेट्टीवार यांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला. बापट यांच्या निधनाला अजून 10 दिवस देखील झाले नाहीत आणि काँग्रेसने अशी चर्चा केली, हे अत्यंत चुकीचे आहे, असेही ते म्हणाले.
एकत्र बसून निर्णय घ्यावा : बापट यांच्या निधनानंतर पुण्यात पोटनिवडणूक होणार आहे का, भाजप यासाठी काय तयारी करत आहे. यावर काकडे यांना विचारले असता ते म्हणाले की, आता आम्ही सर्वजण दुःखात असून आत्ता आम्ही कोणतीही चर्चा यावर केलेली नाही. सगळ्यांनी थोड्या दिवसांसाठी ही चर्चा थांबवावी अशी विनंती देखील यावेळी संजय काकडे यांनी केली. महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांशी बापट यांचे चांगले संबंध होते. सर्वांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा, असे देखील यावेळी संजय काकडे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा : Girish Mahajan On Sambhaji Nagar Dangal : जाणीवपूर्वक विरोधकांकडून दंगल घडवण्याचा प्रयत्न - गिरीश महाजन