महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

छत्रपती मॅनेज होणार नाही, पुढील मूक आंदोलन नांदेडला - संभाजीराजे

मराठा आरक्षणावरुन आंदोलन पुकारणारे भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुन्हा एकदा लढा सुरू करण्याचा इशारा दिला आहे. ते पुण्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीमध्ये बोलत होते.

raje
raje

By

Published : Aug 9, 2021, 8:13 PM IST

Updated : Aug 10, 2021, 6:38 AM IST

पुणे -मराठा आरक्षणावरुन आंदोलन पुकारणारे भाजपचे राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुन्हा एकदा लढा सुरू करण्याचा इशारा दिला आहे. ते पुण्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीमध्ये बोलत होते. दरम्यान, आता पुढचं मूक आंदोलन नांदेड येथे होणार असल्याचंही संभाजीराजेंनी सांगितले.

गोल्डन बॉयचा घरी जाऊन सत्कार करणार

'मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी आपण सगळे एकत्रित आलोय याचा अभिमान आहे. सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राचा सत्कार तो त्याच्या घरी आल्यानंतर त्याच्या घरी जाऊन छत्रपती वंशज म्हणून करणार आहे. त्यासोबत इतर विजेत्यांचाही सत्कार करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच त्यांना महाराष्ट्रातही बोलावून सत्कार करणार', असे यावेळी संभाजीराजेंनी म्हटले.

हेही वाचा -सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्राचे भारतात शानदार स्वागत, पाहा व्हिडिओ

समाजाची माहिती असणाऱ्यांना सदस्य बनवा

'सामाजिक मागास सिद्ध केल्याशिवाय तुम्ही आरक्षणात काहीही करू शकणार नाही. सरकारने अगोदर हे करायला हवं. ज्या लोकांना समाजाची काही माहिती आहे असे लोक सदस्य पाहिजेत. देवेंद्र फडणवीस सरकारने काय केले हे सर्वांना माहीती आहे. आता उध्दव ठाकरेंनी काय केले. कुठल्याही इतर आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण द्यावे. पण संभाजीराजेंची भूमिका आहे की जे वंचित आहेत त्यांना आरक्षण भेटले पाहिजे. जी भूमिका शाहू महाराजांची आहे. सरकारने विचार करावा की ते कसे टिकले पाहिजे', असे संभाजीराजे म्हणाले.

सरकार काय करतंय?

'मी खरच गोंधळून गेलो आहे. नेमकं आरक्षण कसं मिळालं पाहिजे. पण मी धाडस करून बोलतोय तरी इतर कोणी येतंय का. माझं राजकीय जीवन धोक्यात आहे. पण बोलतोय. माझी एकच भूमिका आहे वंचितांना आरक्षण मिळालं पाहिजे. माझी बाजू मांडण्याची भूमिका मी घेत आहे. आरक्षण अनेक दिवस चालेल. पण आपल्या मागण्याचं काय? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांसोबत २२ मागण्यांसाठी बैठक झाली. मात्र अजून यात काहीच केले नाही. आता सरकारने वसतीगृहाबाबत जीआर काढून दाखवावा, आता दोन महिने झाले. सारथीबाबात उपमुख्यमंत्री यांनी बैठक घेतली. आम्ही 1000 हजार कोटी मागितले आहेत. दोन महिने झाले याचे पुढे काहीच नाही झाले. काय करते मग सरकार?', असेही त्यांनी म्हटले.

छत्रपती मॅनेज होणार नाही - छत्रपती

'उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूरला घरी येऊन भेटले. त्यावेळी अनेकजण म्हटले महाराज मॅनेज झाले. पण ज्या दिवशी मॅनेज होईल त्या दिवशी घरी बसेन. छत्रपती असे नाही मॅनेज होणार. माझ्यावर विश्वास ठेवा', असेही छत्रपतींनी म्हटले.

पुढील मूक आंदोनल नांदेडला

'अण्णासाहेब पाटील महामंडळाबाबत काहीच नाही केले. मग हे किती दिवस झाले असं चालणार? ओबीसींना शिक्षणात दिल्या जाणाऱ्या सवलती तरी जाहीर करा. आता काय करायचे आता तुम्ही सांगा. दोन मूक आंदोलनं झाली, तरी राजे शांत. महापूर आला म्हणून आम्ही थांबलो. दोन महिने झाले कोविड परस्थिती सुधारते. पण मराठा समाजाची एवढी आंदोलने झाली. त्यासाठी अजून एक आंदोलन करा. आता पुढील मूक आंदोलन नांदेडला करू', असे छत्रपती म्हणाले.

आता आझाद मैदानावर उपोषण

'समाजाला एक बोलू, आता तुम्ही कशाला आंदोलन करताय. आता तुम्ही आंदोलन करण्यापेक्षा मी एकटा आझाद मैदानावर लाक्षणिक उपोषण करायला तयार आहे. एक दिवस नाही तर जेवढे दिवस समाज सांगेल तेवढे दिवस बसायला तयार आहे', असे संभाजीराजेंनी म्हटले.

हेही वाचा -संसदेत हजर राहण्यासाठी भाजपकडून पक्षाच्या सर्व खासदारांना व्हीप, उद्या 127 व्या घटनादुरूस्ती विधेयकावर चर्चेची शक्यता!

Last Updated : Aug 10, 2021, 6:38 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details