पुणे - पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या मुलाने सीएए, एनआरसी विरोधात निदर्शने करणाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. निदर्शकांनी भाजपविरोधात घोषणाबाजी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सीएए विरोधात निदर्शने करणाऱ्यांविरोधात खासदाराच्या मुलाची तक्रार - पुण्यात सीएए विरोधात निदर्शने, गिरीश बापटांच्या मुलाची तक्रार
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या मुलाने सीएए, एनआरसी विरोधात निदर्शने करणाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. निदर्शकांनी भाजपविरोधात घोषणाबाजी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सीएए विरोधात निदर्शने करणाऱ्यांविरोधात खासदाराच्या मुलाची तक्रार
गौरव बापट यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर निदर्शने करणाऱ्यांविरुद्ध ही तक्रार देण्यात आली आहे. तक्रार अर्ज आला असला तरी याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.