पुणे : खासदार गिरीश बापट यांचे दीर्घ आजाराने निधन आज (29 मार्च) झाले. खासदार बापट यांच्यावर आज संध्याकाळी 7.30 वाजता वैकुंठ स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुलगा गौरव बापट यांच्याकडून अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी खासदार बापट यांना शासकीय इतमामात यांना सलामी देण्यात आली आहे. गिरीश बापट यांच्या अंत्यविधीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री मंगल प्रभात लोढा व पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसेच आमदार-खासदारांसह विविध पक्षाचे नेते अंत्यसंस्काराला उपस्थित होते.
बापटांना अखेरचा निरोप :माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार भीमराव तापकीर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, जिल्हाधिकारी राजेश देशमुख महानगरपालिका आयुक्त पुणे, महानगरपालिका आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्यावतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. आणि शासकीय इतमामामध्ये गिरीश बापट यांना अखेरचा निरोप देण्यात आला आहे. शहरासह राज्यातील अनेक नेत्यांचा अंत्यसंस्काराला सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती होती. तसेच भाजपचे असंख्य कार्यकर्ते व त्यांच्यावर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या शोकभावना :देवेंद्र फडवणीस शोक भावना व्यक्त करत म्हणाले की, कुठलाही काम संकटात नाही. इतक्या उर्मी न करण्याची गिरीश बापट यांची खासियत शैली होती. कार्यमंत्री असताना गिरीश भाऊंनी केलेले काम हे मी कधीही विसरू शकत नाही. कारण मी मुख्यमंत्री होतो आणि ते कुठल्याही प्रश्न निर्माण झाला त्यांचे सर्वच पक्षात मित्र असल्याने त्याचा उपयोग करून ते संकट निघून जायचे. त्यामुळे गिरीश भाऊ बापट यांच्या शिवाय पुण्याचा इतिहास कधीही पूर्ण होणार नाही. इतके काम त्यांनी पुण्यात केले आणि राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या वतीने आणि सर्वच त्यांच्या चाहत्याच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो, असे यावेळी देवेंद्र फडवणीस म्हणाले.