पुणे:छत्रपती संभाजी राजे यांच्या वक्तव्यावर धर्मवीर की धर्म स्वराज्य रक्षक यावरून अजित दादांना राज्यभर भारतीय जनता पार्टी कडून टारगेट (Ajit Pawar Targeted By BJP) केले जात होते. त्यावर सुनील तटकरे यांनी आताही प्रतिक्रिया (Sunil Tatkare criticized BJP) दिलेली आहे. पुण्यातील खडकवासला मतदार संघात आयोजित एक दिवसीय शिबिराला सुनील तटकरे उपस्थित होते. त्यावेळी ते माध्यमाशी बोलत होते. राणे-राऊत वादावर बोलतानाअलीकडच्या काळामध्ये सत्तांतर झाल्यानंतर सुसंस्कृत राजकारणाच्या विचारधारेपासून महाराष्ट्र दूर जातो आहे की काय अशी भीती (Fear of Ajit Pawar to opponents) वाटायला लागली आहे. (BJP most afraid of Ajit Pawar) महापुरुषाबदल संविधानिक पदावर असलेली व्यक्ती तसेच शपथ घेतलेले मंत्री निंदाजनक वक्तव्य करत आहेत. हे सर्व विचार धारेला छेद देणारे आहेत, असेही सुनील तटकरे म्हणाले आहेत. (Latest news from Pune)
राऊतांनासुद्धा उत्तर :नारायण राणे आणि संजय राऊत यांच्या वादावर बोलताना, नारायण राणे आणि संजय राऊत हे शिवसेनेतील मातब्बर नेते होते. नारायण राणेंनी राऊत यांनी राष्ट्रवादीची सुपारी घेतली असल्याचा आरोप करणे हे चुकीचा आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे स्थान वेगळ्या उंचीवर आहे. तुम्हाला परस्पर काय वाद घालायचा आहे तो घाला ,पण राष्ट्रवादीला मध्ये आणण्याचे काही कारण नाही असे म्हणत त्याने राणे आणि राऊतांनासुद्धा उत्तर दिले आहे.