पुणे- 'माझं आंगण माझं रणांगण' हे भाजपचे आंदोलन सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी फेसबुक आणि ट्विटर अकाउंटवरून आंदोलनाचा एक फोटो पोस्ट करुन भाजपवर टीका केली आहे. दरम्यान हा फोटो पिंपरी-चिंचवड शहरातील आमदाराच्या भावाचा आहे. त्यामुळे शहरातील राजकारणही ढवळून निघाले आहे.
राज्यात विविध ठिकाणी भाजपने 'माझं अंगण माझं रणांगण' हे आंदोलन आपापल्या कार्यालय, घराच्या समोर आंगणातून करत राज्य सरकारचा निषेध केला. दरम्यान, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटर आणि फेसबुक अकाउंटवर लहान मुले भाजपचा झेंडा हातात घेऊन भर उन्हात आंदोलनात सहभागी झाल्याचा फोटो पोस्ट केला. यात लहान मुलांचा मास्क खाली सरकल्याचे दिसत आहे. त्यावरून ठाकरे शैलीत आदित्य यांनी भाजपवर टीका केली आहे.