पुणे -देवेंद्र फडणवीस हेच आमचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. बदलाचा प्रश्नच नाही. त्यांचं काम चांगलं आहे. असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. पुण्यात शनिवारी स्थानिक नगरसेवकांच्या वतीने पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा - गोविंदबागेत राजकीय खलबतं, बाळासाहेब थोरात पवारांच्या भेटीला
पाटील म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या निवडून आलेल्या आमदारांची बैठक येत्या 30 तारखेला दुपारी एक वाजता विधानभवनात होईल. त्यासाठी पक्षाचे केंद्रीय निरीक्षक उपस्थित असतील. या बैठकीत आमचा संसदीय नेता निवडला जाईल असे पाटील यांनी सांगितले, आपल्याला काय हवं आहे ते व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो. मात्र, सत्तास्थापने संदर्भातील सर्व निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना आहेत. पुढील दोन-तीन दिवसात याबाबतची बोलणी सुरू होतील. आवश्यकता भासल्यास राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी ते बोलतील.