पुणे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शनिवारी दुपारी पुणे जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर सायंकाळी हडपसरमार्गे पुणे शहरात पोहोचली. या यात्रेचे पुणे शहरात ठिकठिकाणी भाजपचे आमदार, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले.
नियोजित यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी पुणे शहर भाजपकडून करण्यात आली होती. अनेक ठिकाणी रस्त्यावर बॅनर लावण्यात आले होते. शहरात सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास महाजनादेश यात्रा पुण्यात आली. शहरातील ६० छोट्या-मोठ्या चौकातून ही यात्रा नेण्यात आले.