महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ओबीसींसह सर्व समाजाचा महाविकास आघाडी सरकारने विश्वासघात केला - टिळेकर - योगेश टिळेकर न्यूज

पंढरपूर येथे भारतीय जनता पार्टीकडून ओबीसी जागर अभियान आरंभ झाला. पंढरपुरातील नामदेव पायरी येथून अभियानाला सुरुवात करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी संघटनेच्या वतीने विठ्ठलाच्या साकडे घातले.

योगेश टिळेकर
योगेश टिळेकर

By

Published : Oct 9, 2021, 8:54 PM IST

Updated : Oct 9, 2021, 9:03 PM IST

पंढरपूर -महाविकास आघाडी सरकारने राज्यातील ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत विश्वासघात केला आहे. इतरही जातीतील आरक्षण हिरावून घेतले. त्यामुळे मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणाबाबत ठाकरे सरकारला सुबुद्धी द्यावी व ओबीसी समाजाचे रद्द झालेले आरक्षण पूर्ववत करावे, असे साकडे विठ्ठलाचरणी भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी घातले आहे.

ओबीसी जागर महायात्रेची सुरुवात

पंढरपूर येथे भारतीय जनता पार्टीकडून ओबीसी जागर अभियान आरंभ झाला. पंढरपुरातील नामदेव पायरी येथून अभियानाला सुरुवात करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी संघटनेच्या वतीने विठ्ठलाच्या साकडे घातले. संत तनपुरे महाराज मठ येथील ओबीसी समाजाचा मेळावा घेत ओबीसी जागर महायात्रेची सुरुवात करण्यात आली. माजी केंद्रीय मंत्री हंसराज आहिर, माजी मंत्री राम शिंदे, माजी आमदार योगेश टिळेकर, माजी मंत्री सीताराम कुंटे, आ. विजयकुमार देशमुख, आ. रणजित सिंह मोहिते पाटील, आ. प्रशांत परिचारक, आ. समाधान अवताडे, आ. राम सातपुते यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारचे वाभाडे काढले.

'ठाकरे सरकारने ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आश्वासन दिले होते. राज्यातील ओबीसी समाजातील आरक्षण पूर्ववत झाल्याशिवाय निवडणुका घेणार नाही, मात्र महाविकास आघाडी सरकारकडून पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले असल्याची टीका योगेश टिळेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

'ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभर दौरा'

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षात ओबीसी समाजाचा विश्वासघात केला आहे. मराठा समाजाचे आरक्षण रद्द करून विश्वासघात केला. त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडून राज्यभर पक्षातील आमदार-खासदारांना घेऊन ओबीसी आरक्षणाचा जागर अभियान यात्रा काढली जाणार असल्याची माहिती टिळेकर यांनी दिली.

Last Updated : Oct 9, 2021, 9:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details