पुणे -शिवसेना जर एआयएमआयएम बरोबर गेली तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. ( MIM Proposal to Mahavikas Aghadi ) कारण संपूर्ण आयुष्यभर बाळासाहेबांनी ज्यांच्यावरती टीका केली त्यांच्याच मांडीला मांडी लावून हे सत्तेत गेले आहेत आणि त्याचमुळे जनतेमध्ये शिवसेनेविषयी अतिशय वाईट पद्धतीची भावना निर्माण झाली आहे. शिवसेना ही आपल्या हिंदुत्वापासून कोसो मिल दुर गेली असल्याची टीका भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. ( Pravin Darekar criticize Shivsena on Hindutva )
शिवसेना ही सत्तेसाठी आंधळी -
सत्ताधारी म्हणून हिंदूंसाठी काय केलं, याचा विचार सेनेने करावा, असा सल्ला देताच दरेकरांनी शिवसेनेच्या सगळ्या कृती हिंदुत्त्व विरोधी असल्याचा हल्लाबोल केला आहे. शिवसेनाही सत्तेसाठी आंधळी झाली आहे आणि हे जनतेला आता लक्षात आल असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच जनतेला संबोधन करत असताना उत्तर प्रदेशमध्ये सपाने भाजपला कसं रोखल हे सांगितल होतं. मुख्यमंत्र्यांचे हे विधान म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. त्याचबरोबर शिवसेनेने उत्तर प्रदेश आणि गोव्यात मोठमोठ्या सभा घेतल्या. मात्र, त्यांना नोटापेक्षा कमी मतं मिळाली. याउलट महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला सेनेपेक्षा जास्त मते मिळाली, असेही दरेकर म्हणाले.