महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अजित पवारांच्या गुंडांना आम्ही दमडीची किंमत देत नाहीत - किरीट सोमैया - किरीट सोमैया न्यूज

जरंडेश्वर येथे गुंडगिरी करत माझ्या हाताला धरून ओढून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. माझ्या अंगरक्षक व पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे, असे सांगून अजित पवार आम्ही तुमच्या गुंडांना दमडीची किंमत देत नसल्याचे भाजपा नेते किरीट सोमैया यांनी म्हटले आहे.

किरीट सोमैया
किरीट सोमैया

By

Published : Oct 6, 2021, 6:43 PM IST

Updated : Oct 6, 2021, 6:56 PM IST

बारामती - जरंडेश्वर येथे गुंडगिरी करत माझ्या हाताला धरून ओढून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. माझ्या अंगरक्षक व पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे, असे सांगून अजित पवार आम्ही तुमच्या गुंडांना दमडीची किंमत देत नसल्याचे भाजपा नेते किरीट सोमैया यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

'जरंडेश्वर'च्या मालमत्तेची पाहणी करण्यासाठी बारामतीत

जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना घोटाळा व परिवहन मंत्री अनिल परब यांचे तत्कालीन सहायक व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या मालमत्तेची पाहणी करण्यासाठी सोमैया आज बारामतीत होते, यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत संवाद साधला.

'महाराष्ट्राला लुटण्याचे धंदे बंद करावेत'

अली बाबा आणि चाळीस चोरांचे घोटाळे संजय राऊत, मिलिंद नार्वेकर या आपल्या सहयोगींकडून शिकावे, असा घणाघात ठाकरे आणि पवारांवर केला. संजय राऊत यांनी गुपचूप रात्री पावणेदहाच्या सुमारास ईडी कार्यालयाच्या मागील दाराने आत जाऊन चोरीचे ५५ लाख रुपये परत केले. तर नार्वेकर यांनी केंद्राची टीम आल्याचे लक्षात येताच आपला अनधिकृत बंगला नोटीस येण्याच्या आधीच पाडल्याचे सोमैया म्हणाले.

Last Updated : Oct 6, 2021, 6:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details