पुणे -महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पूर्व परीक्षा रद्द केल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. तसेच विरोधी पक्ष भाजपानेही सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. सरकारमध्ये बेबंदशाही सुरू असून त्यांच्यात आपापसात समन्वय नाही, सगळे घटकपक्ष वेगवेगळी भूमिका मांडत आहेत. हे सरकार लबाड आहे. त्यांच्यावर विद्यार्थ्यांनी का भरोसा ठेवावा, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तसेच जिथे जिथे आंदोलन होणार तिथे भाजप जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ते पुण्यात बोलत होते.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, जगभरात कोरोनाचे सावट अद्याप संपले नाही. अनेक आजार आले, आताही आहेत. मात्र योग्य ती काळजी घेऊन सर्व व्यवहार सुरू राहिल पाहिजेत. व्यापार बंद करा, कंपन्या बंद करा, परीक्षा रद्द करणे हे काही राज्याला परवडणारे नाही. त्यामुळे राज्यात लॉकडाऊनबाबत विचार करू नयेत.