प्रतिक्रिया देतांना भाजपा नेत्या चित्रा वाघ पुणे : मुलींना लग्नाचं अमिश दाखवून पळवून नेलं जातं. धर्मांतरासाठी जबरदस्ती केली जाते, हे पाहता लव्ह जिहाद चा कायदा आलाच (there should be a Love Jihad Act in Maharashtra) पाहिजे, असं मत भाजपा नेत्या चित्रा वाघ (BJP leader Chitra Wagh) यांनी व्यक्त केलं आहे. तसेच महिलांनी बोलतांना आपली एक रेषा आखून ठेवली पाहिजे. बोलताना मर्यादा ओळखून बोललं पाहिजे. टाळ्या, शिट्ट्या अशी भाषा वापरली तरच मिळेल, असा जर कोणाचा गैरसमज असेल, तर तो करू नये. तो फार काळ टिकत नाही, असं म्हणत शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांचं नाव न घेता, त्यांना टोला लगावला आहे.
लव्ह जिहाद कायदा : चित्रा वाघ म्हणाल्या की, मुलींना पळवून नेणं, लग्नाचं अमिश दाखवणं, मुलींवर जबरदस्ती करणं, हे सुरु असतांना त्यांच्यासाठी आणि त्यांच्या परिवारासाठी कुठलाच कायदा नाही. श्रद्धा वालकर ची केस पुढे आल्याने हा विषय मोठा झाला आहे. आई वडिलांना ठोकर मारून तीने प्रेम केलं. त्या व्यक्तीवर विश्वास टाकला. तिचा अंत खूप वाईट झाला, जो तिने कधीच विचार केला नसेल. मुलींना लग्नाचं अमिश दाखवून मुलींचे जबरदस्ती धर्मांतरण करऩे या गोष्टी मोठ्या प्रमाणावर होत आहेत. म्हणून, उत्तर प्रदेश च्या धर्तीवर लव्ह जिहाद कायदा यायलाच पाहिजे, असं चित्रा वाघ म्हणाल्या.
सुषमा अंधारेंना टोला :पुढे त्या म्हणाल्या की, महाराष्ट्राची संस्कृती आपल्याला माहिती आहे. त्यामुळं आपण ही बोलताना आपली भाषा नीट वापरली पाहिजे. शब्दांचा नीट उपयोग केला पाहिजे. महिलांनी बोलताना आपली एक रेषा आखून घेतली पाहिजे. संस्कृतीच्या बाहेर झालं असेल तर लोकांचा तो उद्वेग असतो, तो ते व्यक्त करतात. नीलम गोर्हे या वरिष्ठ नेत्या आहेत. त्यांच्याबाबत असा वाद उद्भवला असं मी पाहिलं नाही. टाळ्या, शिट्ट्या अशी भाषा वापरली तरच मिळतात, असा जर गैरसमज कोणाचा असेल तर तो करू नये, तो फार काळ टिकत नसतो. महिला आणि पुरुषांनी जबाबदारीने वागलं पाहिजे. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. एकमेकांना कोपर खळ्या मारतो. प्रत्येकाने आपली मर्यादा ओळखून बोललं पाहिजे ,असं म्हणत शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांचं नाव न घेता, त्यांना टोला लगावला.
राऊतांवर टीका : पुढे त्या म्हणाल्या की, संजय राऊत हे सर्वज्ञानी आहेत. छत्रपती शिवाजी महाराज बद्दल बोलताना प्रसाद लाड यांच्यावर टीका करण्यात आली. त्यांनी चूक मान्य केली दिलगिरी व्यक्त केली होती. आता संजय राऊत यांनी देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून माफी मागितली पाहिजे. पुढे ते म्हणाल्या की, महिला आमदार आमच्या पक्षात जास्त आहेत. भाजपा हा महिलांना प्राधान्य देणारा पक्ष आहे. येणाऱ्या मंत्री मंडळात तीन- चार महिलांना नक्की प्रतिनिधित्व मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.