पोलिसांवर राजकीय दबाव- मारहाण झालेल्या कॉन्ट्रॅक्टरची प्रतिक्रिया पुणे : माजी आमदाराचा पुतण्या आदित्य संचेती आणि राहुल संचेती यांचा पुण्यातील कल्याणी नगर आणि बाणेर या दोन ठिकाणी बांधकाम व्यवसाय आहे. त्यांनी या ठिकाणी दोन वेगवेगळ्या कमर्शिअल बिल्डिंग बांधल्या आहेत. त्या कमर्शियल बिल्डिंगचा कामगार पुरवठा हे राहुल पंडित नावाचे लेबर कॉन्ट्रॅक्टर करत होते. त्यानुसार त्यांना काही पैसेही देण्यात आले होते. काम संपल्यानंतर शेवटच्या पैशासाठी राहुल पंडित यांनी सातत्याने त्यांच्याकडे पैशाच्या मागणीसाठी पाठपुरावा करत होते. परंतु, ते भेटायला तयार नसल्याने राहुल पंडित एका दिवशी कार्यालयात गेले.
जीवे मारण्याची धमकी :राहुल पंडित यांना आदित्य संचेती आणि त्यांच्या पाच-सहा कार्यकर्त्यांनी लोखंडी साहित्याच्या मदतीने डोक्यात जबर मारहाण केली. त्यांचा पाय तुटेपर्यंत मारहाण केली. त्यांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिल्याचे राहुल पंडित यांनी सांगितले आहे. या विरोधात बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झालेली आहे. परंतु, राजकीय दबावापोटी यात कुठलीही कार्यवाही होत नसल्याचे राहुल पंडित यांनी म्हटलेले आहे. मला न्याय भेटला पाहिजे. माझ्या कामगारांचे पैसे भेटले पाहिजे. त्यांचे पैसे मी सोडू शकत नाही, असे राहुल पंडित म्हणाले आहेत.
पोलिसांवर राजकीय दबाव : राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडवणीस आहेत. एखाद्या माजी आमदाराच्या भाजपाच्या पुतण्याकडून अशा प्रकारे पुण्यात दादागिरी केली जात असेल, तर गृहमंत्रालय याची गंभीरतेने दखल घेत नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्राने दिली आहे. वरच्या स्तरावरून पोलिसांवर खूप मोठा दबाव असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय दबाव वापरून गरीब लोकांचे पैसे बुडवणाऱ्या या माजी आमदाराच्या पुतण्यावर कार्यवाही होणार का? राजकीय फायदा घेऊन सोडून देण्यात येणार, हेच पाहणे आता महत्त्वाचे आहे.
आदित्य संचेती यांची प्रतिक्रिया : याबाबत आदित्य संचेती यांच्याशी विचारणा केली असता ते म्हणाले की, यावर जी काही आमची प्रतिक्रिया आहे. ती आम्ही पोलीस स्टेशनमध्ये देऊ. त्याने पोलिसात तक्रार केली आहे, अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यामुळे इतर विषयाशी माध्यमांशी मी बोलणार नसल्याचे सुद्धा आदित्य संचेती यांनी म्हटले आहे. त्यामुळे झालेला प्रकार पोलीस दाबण्याचा प्रयत्न करतात का? असाही प्रश्न निर्माण झालेला आहे.
हेही वाचा :
- Urea Black Market : युरियाचा काळाबाजार; कृषी साहित्य विक्री संचालकास शिवसैनिकांची मारहाण
- UP Crime News : चोरीच्या आरोपावरून 23 वर्षीय तरुणीला बेदम मारहाण, तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
- Fadnavis On Geeta Jain : लोकप्रतिनिधींनी संयम बाळगला पाहिजे, गीता जैन मारहाण प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया