महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पेट्रोल-डिझेल स्वस्त करायचे असेल तर राज्याने 2-5 टक्के टॅक्स कमी करावा - आशिष शेलार - पेट्रोल-डिजेल दरवाढ

'पेट्रोल-डिझेलवरील टॅक्स राज्य सरकार जवळपास 35 ते 40 टक्के घेत आहे. पेट्रोल-डिझेल स्वस्त करायचे असेल तर राज्याने 2 ते 5 टक्के टॅक्स कमी करावा', असे भाजपा नेते आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

पुणे
पुणे

By

Published : Jul 21, 2021, 3:19 PM IST

पुणे - 'केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील निधी हा सामाजिक उपक्रमात जास्तीत जास्त लावला आहे. पेट्रोल डिझेलवरील टॅक्स राज्य सरकार जवळपास 35 ते 40 टक्के घेत आहे. केंद्रातील विरोधी पक्ष आणि राज्यातील सत्ताधारी पक्षाला पेट्रोल-डिझेल स्वस्त करायचे असेल तर किमान 2 ते 5 टक्के टॅक्स कमी करावा', असे मत भाजपा नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केले आहे.

भाजपा नेते आशिष शेलार

टोकियो खेळाडुंच्या शुभेच्छासाठी सेल्फी पॉईंटचे उद्घाटन -

टोकियो खेळाडुंच्या शुभेच्छासाठी सेल्फी पॉईंटचे उद्घाटन

पुणे महानगरपालिकेच्या क्रीडा समितीच्या वतीने टोकियो ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्र व देशभरातून गेलेल्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी फोटो-सेल्फी पॉईंटचे उद्घाटन आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळही उपास्थित होते.

जागोजागी सेल्फी पॉईंट उभारणार -

'भारतीय संघ ऑलिम्पिकमध्ये यशस्वी कारकीर्द करेल, यासाठी समस्त भारतीयांची प्रेरणा त्यांच्यामागे आहे. आज प्रतिकात्मक अशा एका सेल्फी पॉईंटचे उद्घाटन करण्यात आले आहे. पुणे महानगरपालिकेच्यावतीने जागोजागी ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेडाळूंना पाठबळ आणि त्या खेडाळूचे मनोधैर्य वाढवण्यासाठी असे सेल्फी पॉईंट लावण्यात येतील', असेही यावेळी शेलार यांनी म्हटले.

'पुणे पालिकेचे मुंबई पालिकेपेक्षा उत्तम काम'

'मुंबईत धोकादायक इमारती पडून ज्या नागरिकांचा मृत्यू झाला, ते दुर्दैवी आहे. या सगळ्यांवर डिझास्टर मॅनेजमेंटने काम केले पाहिजे होते. पण ते मुंबईत दुर्दैवाने फेल झाले आहे. या दुर्घटनेत 30 पेक्षा जास्त बळी गेले आहेत. पुणे महापालिकेने मुंबई महापालिकेपेक्षा उत्तम काम आणि पूर्व नियोजन केले आहे', असेही यावेळी शेलार म्हणाले.

हेही वाचा -तेरे साथ तिरंगा है! Tokyo Olympics साठी भारताचं जबराट थीम सॉन्ग

ABOUT THE AUTHOR

...view details