दौंड(पुणे) - शेतीपंपांचा वीज पुरवठा खंडीत केल्याच्या निषेधार्थ दौंड तालुक्यातील दापोडी येथील महावितरण कार्यालयावर भाजपने मोर्चा काढला. यावेळी अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. महाविकास आघाडी सरकार हे जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम करत आहे. राज्यात सरकार आहे का नाही अशा प्रकारची परिस्थिती शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. दौंड तालुक्यात नदीला, बोरला, विहीरीला पाणी आहे. मात्र, वीज वितरण कंपनीच्या चुकीच्या कारभारामुळे शेतकरी त्रस्त आहे. शेतकऱ्यांचे वीजबिल त्वरित माफ करून वीज पुरवठा त्वरित सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष वासुदेव काळे यांनी केली आहे.
महावितरणकडून शेती पंपांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. त्याच्या निषेधार्थ भाजपाच्यावतीने दौंड तालुक्यातील दापोडी येथील वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी वासुदेव काळे हे बोलत होते.
पुढे बोलताना काळे म्हणाले की, महावितरणकडून शेती पंपांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे, त्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचा मोठा मोर्चा आज वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयावर काढण्यात आला आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विजबिलाबाबत चुकीचे धोरण राबवित आहे. चुकीची बिले वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना दिलेली आहेत. चुकीच्या वीज बिलांमुळे वीज बिल भरायला तयार असणारा शेतकरी मागे सरत आहे. आमची मूलभूत मागणी अशी की या सरकारने डिसेंबर 2021 पर्यंतची संपूर्ण वीज बिल माफी करावी. 1 जानेवारी 2022 पासून शेतकऱ्यांना नव्याने वीजबिल आकारावे.
मुख्यमंत्र्यांवर कांचन कुल यांची टीका