दौंड (पुणे) -दौंड तहसील कार्यालयावर वंचित पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफिचा लाभ मिळावा या मागणीसाठी भाजप पुणे जिल्हा किसान मोर्चाच्या वतिने ठिय्या आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार संजय पाटील यांना देण्यात आले.
पुरग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफिचा लाभ द्या, भाजप किसान मोर्चाचे आंदोलन - भाजप दौंड तालुका अध्यक्ष माऊली ताकवणे
जुलै ते ऑगस्ट २०१९ या कालावधीत भिमा नदी काठावरील शेतकऱ्यांच्या पिंकाचे नुकसान झाले होते. या नुकसानीचे महसूल विभागाकडून पंचनामे करण्यात आले होते. परंतु शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही नाही आणि कर्ज माफी पण मिळाली नाही. यामुळे शेतकरी त्रस्त झाल्याने हे आंदोलन करण्यात आले, अशी माहिती जनता पार्टी किसान मोर्चाचे सरचिटणिस माऊली शेळके यांनी दिली.
पुरग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफिचा लाभ द्या
यावेळी भारतीय जनता पार्टीचे दौंड तालुका अध्यक्ष माऊली ताकवणे, पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे सरचिटणिस माऊली शेळके, ग्रामविकास आघाडी सहसंघटक गणेश आखाडे,कानगांव विकास संस्थेचे माजी अध्यक्ष रमेश गवळी, दत्तात्रय फडके, गणपत नलवडे, नानासो सरडे, नानासो गवळी, भाऊसाहेब कोह्राळे,रोहीदास रोडे, राजेंद्र मोरे, सुनिल महाडीक, बाळासाहेब चव्हाण, नवनाथ कोह्राळे यांसह शेतकरी बांधव उपस्थित होते.